BEST Strike Live: बेस्टवर अडीच हजार कोटींचं कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरीय समितीला अहवाल सादर

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 06:41 AM2019-01-15T06:41:05+5:302019-01-15T13:33:22+5:30

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल सुरुच

BEST Strike Live: बेस्टवर अडीच हजार कोटींचं कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरीय समितीला अहवाल सादर | BEST Strike Live: बेस्टवर अडीच हजार कोटींचं कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरीय समितीला अहवाल सादर

BEST Strike Live: बेस्टवर अडीच हजार कोटींचं कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरीय समितीला अहवाल सादर

Next

मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज आठवा दिवस आहे. या प्रकरणी काल बेस्ट वर्कर्स युनियनला उच्च न्यायालयानं चांगलंच खडसावलं. ‘तुमच्या मागण्या रास्त असल्या तरी त्यासाठी सामान्यांना वेठीस धरू नका. या संपावर राज्य सरकार आणि युनियननं तोडगा काढावा. त्यात ते अपयशी ठरले तर आम्ही मंगळवारी योग्य तो आदेश देऊ,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयानं संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना आणि सरकारला सुनावलं. उच्च न्यायालयानं सरकारनं नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीचा अहवाल आज दुपारपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश महाअधिवक्त्यांना दिले. त्यामुळे संपावर आज तरी तोडगा निघणार की न्यायालयाला आदेश द्यावा लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल काल उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं संपकरी कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली. या परिस्थितीवर तोडगा काढण्यास राज्य सरकार आणि युनियन अपयशी ठरले तर आम्ही मंगळवारी योग्य ते आदेश देऊ. ही स्थिती कायम राहू शकत नाही, असं मुख्य न्या. नरेश पाटील व न्या. एन.एम. जामदार यांच्या खंडपीठानं म्हटलं. राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीला संप करणाऱ्या बेस्ट वर्कर्स युनियनबरोबर चर्चा करून वाटाघाटी करण्याचे निर्देश दिले. तसेच याचा अहवालही उच्च न्यायालयात सादर करण्याचे निर्देश महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना दिले. गेल्या आठवड्यात बेस्टच्या ३२ हजार कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. त्यामुळे बेस्टच्या ३ हजार ७०० बसेस डेपोमध्ये उभ्या आहेत. या संपाविरोधात व्यवसायानं वकील असलेल्या दत्ता माने यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. 
 

LIVE

Get Latest Updates

01:32 PM

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दर महिन्याला 175 कोटींचं उत्पन्न आवश्यक; मात्र सध्याचं उत्पन्न केवळ 90 कोटी

01:31 PM

बेस्ट प्रशासनाकडून उच्चस्तरीय समितीला अहवाल सादर; अहवालात महत्त्वपूर्ण माहिती

12:11 PM

कंत्राटी कर्मचारी घेण्याचा विचार; बेस्ट प्रशासनाच्या अहवालातील महत्त्वपूर्ण माहिती
 

12:10 PM

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज घ्यावं लागतं- बेस्टचा अहवाल
 

12:10 PM

कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करणं अशक्य- अहवाल
 

12:09 PM

बेस्टचं दिवसाचं उत्पन्न 3 कोटी, पण खर्च 6 कोटी- अहवाल
 

12:08 PM

कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरसकट मान्य केल्यास 550 कोटींचा भार पडणार- अहवाल
 

12:08 PM

बेस्टवर 2.5 हजार कोटींचं कर्ज- अहवाल
 

12:07 PM

बेस्ट प्रशासनाचा वर्षभराचा तोटा 900 कोटी; बेस्ट प्रशासनाच्या अहवालातून महत्त्वपूर्ण आकडेवारी समोर

12:06 PM

संप आज मिटेल अशी आशा- शशांक राव

11:28 AM

मंत्रालयात उच्चस्तरीय चर्चेची तिसरी फेरी सुरू

11:27 AM

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल

07:10 AM

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आठवा दिवस; चाकरमान्यांचे हाल सुरूच

Web Title: BEST Strike Live: बेस्टवर अडीच हजार कोटींचं कर्ज; प्रशासनाकडून उच्चस्तरीय समितीला अहवाल सादर

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.