Join us

‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांना मिळणार सानुग्रह अनुदान, महापौरांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 01:40 IST

best employees : सोमवारी १५ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या.

मुंबई :  बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असल्याने कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा मुद्दा दरवर्षी गाजतो. मात्र यंदा बेस्ट कामगारांची दिवाळी गोड करण्याची जबाबदारी महापालिकेने उचलली आहे. पालिका कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर ‘बेस्ट’मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी जाहीर केले.पालिका कर्मचाऱ्यांना सोमवारी १५ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. बेस्ट उपक्रमातील कामगार संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर धाव घेतली. मंगळवारी संध्याकाळी महापौर आणि कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाल्यानंतर बोनसची रक्कम निश्चित करण्यात आली. - संबंधित वृत्त/२

टॅग्स :बेस्टमुंबई