वीज बिलात दाेन टक्क्यांची ‘बेस्ट’ सूट; आर्थिक अडचणींमुळे हाेरपळलेल्या ग्राहकांवर सवलतीची फुंकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 01:23 AM2020-11-09T01:23:23+5:302020-11-09T07:00:08+5:30

काेराेना संकटकाळ

‘Best’ discount on electricity bills | वीज बिलात दाेन टक्क्यांची ‘बेस्ट’ सूट; आर्थिक अडचणींमुळे हाेरपळलेल्या ग्राहकांवर सवलतीची फुंकर

वीज बिलात दाेन टक्क्यांची ‘बेस्ट’ सूट; आर्थिक अडचणींमुळे हाेरपळलेल्या ग्राहकांवर सवलतीची फुंकर

googlenewsNext

मुंबई :  कोरोनादरम्यान लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात वीज ग्राहकांना मदत करण्यासाठी तसेच वीज बिल भरण्यास प्रोत्साहित करून थकबाकी वसुलीसाठी बेस्टने वीज ग्राहकांना बिलात दाेन टक्क्यांची सूट दिली.

बेस्टकडून प्राप्त माहितीनुसार, पर्याय एकमध्ये वीज ग्राहकाने नोव्हेंबर महिन्याचे वीज बिल तत्काळ भरले तर त्यास एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमधील वीज वापरावरील प्रदान आकार आणि वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज माफ करण्यात येईल. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या वीज वापराच्या बिलात २ टक्के सूट देण्यात येईल.

पर्याय दोनमध्ये नोव्हेंबरचे वीज बिल नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये भरल्यास एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमधील वीज वापरावर विलंब शुल्क आणि व्याजात सूट दिली जाईल. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वीज वापराच्या बिलावर १ टक्का सूट दिली जाईल.

पुढील बिलात  हाेणार समाविष्ट
तिन्ही हप्ते वेळेत भरले तर व्याजाबाबत सूट दिली जाईल.  हप्ता भरल्यानंतर ग्राहक त्यावरील सूट मिळविण्यास पात्र राहील. ती पुढील बिलात समाविष्ट केली  जाईल. शिवाय ज्यांनी वेळेत बिले भरली आहेत त्यांना २ टक्के सूट  दिली जाईल.

Web Title: ‘Best’ discount on electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.