मुंबई : पगार वेळेत न झाल्याने बेस्टच्या विविध आगारांमध्ये कंत्राटी बसवाहक आणि चालक मागील काही दिवसांपासून संप करत आहेत. मुंबई सेंट्रल आगारात शुक्रवारी ओलेक्ट्रा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सकाळपासून आंदोलन केले. त्यामुळे या आगारातील ६० बस गाड्या बाहेर न पडल्याने प्रवाशांचे हाल झाले.
मुंबई सेंट्रल आगारातील बंद दुपारी २ च्या सुमारास मागे घेण्यात आल्याची माहिती ‘बेस्ट’ने दिली. मात्र, या कंत्राटी बस आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर बेस्टचे नियंत्रण का नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आर्थिक गणित बिघडल्याने ‘बेस्ट’ने स्वमालकीच्या बसऐवजी कंत्राटी बस घेण्याचा सपाटा लावला आहे.