महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘बेस्ट’ व्यवस्था, अनुयायांच्या सोयीकरिता विशेष गाड्यांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:32 IST2017-12-03T00:31:54+5:302017-12-03T00:32:04+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाºया अनुयायांच्या सोयीकरिता बेस्टतर्फे विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘बेस्ट’ व्यवस्था, अनुयायांच्या सोयीकरिता विशेष गाड्यांची सोय
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाºया अनुयायांच्या सोयीकरिता बेस्टतर्फे विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ४ ते ७ डिसेंबर या काळात दादर स्थानक (पश्चिम) ते शिवाजी पार्कदरम्यान ‘दादर फेरी-२’ या बसमार्गावर संपूर्ण दिवस विशेष बसफेºया चालविण्यात येणार आहेत. विशेषत: ५ डिसेंबर रोजी संपूर्ण रात्र व ६ डिसेंबर रोजी २४ तास ही बससेवा सुरू असेल.
बोरीवली रेल्वे स्थानक (पूर्व) येथून कान्हेरी गुंफा दरम्यान बसमार्ग क्रमांक १८८ वर सकाळी ९ ते सायंकाळी ७ दरम्यान बससेवा चालविण्यात येईल. मालाड स्थानक (पश्चिम) ते मार्वे चौपाटी दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ७ दरम्यान बसमार्ग २७२ वर बस धावतील. बोरीवली स्थानक (पश्चिम) ते गोराई खाडी दरम्यान सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत बसमार्ग क्रमांक २४७/२९४ या बसमार्गांवर अतिरिक्त बससेवा चालविण्यात येणार आहे. शहरी प्रवासाकरिता दैनंदिन बसपास ४० रुपये, उपनगरीय प्रवासाकरिता ५० रुपये आणि प्रवर्तन क्षेत्राकरिता ७० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ४ ते ९ डिसेंबर या काळात आरएफ-आयडी स्मार्ट कार्ड ओळखपत्राची अट शिथिल करण्यात आली आहे.