‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, महामंडळांना कर्जमाफी द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 05:31 AM2020-01-08T05:31:05+5:302020-01-08T05:31:14+5:30

सत्तेवर येण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते.

'Beat farmers seven times, give corporation loan waiver' | ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, महामंडळांना कर्जमाफी द्या'

‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, महामंडळांना कर्जमाफी द्या'

googlenewsNext

मुंबई : सत्तेवर येण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र केवळ २ लाख शेतकºयांना कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे इतर शेतकºयांचे सर्व कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठीही रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या १० जानेवारीला राज्यभर निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती मंगळवारी रिपाइंच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणाले की, शेतकºयांप्रमाणेच मागासवर्गीय तरुणांना उद्योगासाठी दिलेले अंदाजे १३ कोटींचे कर्ज माफ करावे, अशीही आमची मागणी आहे.
तर नागरिकत्व सुधारणा कायदा हा नागरिकत्व देणारा कायदा केंद्र सरकारने केला असल्याने त्याला पाठिंबा देण्यासाठी येत्या १० जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत. वांद्रे पूर्व येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे समर्थन रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीचे नेतृत्व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी दिली.

Web Title: 'Beat farmers seven times, give corporation loan waiver'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.