Join us  

मंत्रालयात आलेल्या लोकांना नक्की भेटा, मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 7:24 AM

मुख्यमंत्री शिंदे यांचा अधिकाऱ्यांना सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकांचे प्रश्न सोडवताना सकारात्मकता ठेवा,  राज्यभरातून मंत्रालयात  कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी केंद्र पुरस्कृत तसेच राज्याच्या योजना गतीने मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा असे निर्देश दिले.सर्व विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. प्रशासन संवेदनशील, सचोटीचे, प्रामाणिक हवे अशी जनतेची अपेक्षा आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिलेली आहे. केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करा, केंद्राचा निधी राज्याला अधिकाधिक मिळाला पाहिजे असे नियोजन करा, सचिवांनी नावीन्यपूर्ण योजना सुचवाव्यात, त्यांची अंमलबजावणी केली जाईल, मी स्वत: तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध असेल, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली.महाराष्ट्राची देशात एक चांगली प्रतिमा आहे. खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्य शासनाच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली आहे.  तसेच इतर केंद्रीय मंत्रीदेखील राज्याला सहकार्य करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा वेळी नावीन्यपूर्ण योजनादेखील आपण मांडल्या पाहिजेत. नवनवीन  उपक्रमांचे स्वागत आहे.  केंद्राचा जास्तीत जास्त निधी कसा मिळेल हे पाहून तत्काळ असे प्रस्ताव सादर करावेत. विशेषत: रेल्वे, महामार्ग याबाबतीत केंद्राकडील पाठपुरावा वाढवावा.  राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करताना गतिमान व गुणवत्तापूर्ण कामे झाली पाहिजेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह सर्व विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

आवश्यक कामांना स्थगिती दिलेली नाहीnमागील सरकारने शेवटी शेवटी घाईघाईत, घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. जनतेशी संबंधित  आवश्यक अशा कामांना स्थगिती नाही. nराज्याच्या विकासासाठी १०० दिवसांचा धडक कार्यक्रम लवकरच जाहीर केल जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनामुख्यमंत्री