Join us

पर्यावरणाचे भान राखा; गणेशोत्सवातला आनंद आणि समाधान मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 14:33 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणेश यावर्षी घरच्या पातळीवरच करा.

मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणेश यावर्षी घरच्या पातळीवरच करा. जा ये नको. विसर्जन नको. गर्दी टाळा, असे आवाहन  गेल्या महिन्यात मुंबई ग्राहक  पंचायतीच्या ३३ हजार सदस्यांना करण्यात आले होते. घरातल्या घरात उत्सवाचा आनंद आणि समाधान मिळेल, अशा त-हेने उत्सव साजरा करा, असे आवाहन करण्यात आले होते. असे आवाहन करताना कोणत्या कल्पना राबविता येतील? त्या कळविण्याचे आवाहन केले होते. त्यास कल्पना लेख स्पर्धा असे म्हटले होते. आणि यास भरघोस प्रतिसाद मिळाला असून, पर्यावरण पूरक  उत्सव साजरे करतानाच उत्सव हा जगण्याचा भाग आहे. त्यामुळे हे करताना आनंद आणि समाधान पाहिजे असेल तर पर्यावरणाची हानी झाली नाही पाहिजे, अशी भूमिका मुंबई ग्राहक पंचायतीने मांडली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही गणपती आणण्यासाठी घराबाहेर पडणार नाही. गणेशाचे चित्र काढून त्याची पूजा करू. किंवा स्वत: गणपती तयार करू, असे म्हणणे लोकांनी पंचायतीकडे मांडले. शिवाय आम्ही ज्या मूर्तीकाराकडून मूर्ती घेतो त्याकडून मूर्ती घेतली नाही तर त्यास अडचणी होईल. म्हणून आम्ही त्याकडून मूर्ती घेणार आहोत, असे म्हणणे काही लोकांनी मांडले. काही लोकांनी मोलकरणींच्या कुटूंबाला, काही लोकांनी वॉचमनच्या कुटूंबाला जेवण्यास बोलाविल्याचे सांगितले. एका महिलेने सांगितले की मी माझ्या मोलकरणीच्या मुलीला संगणक घेऊन देणार आहे. कारण यावर्षी माझे पैसे वाचले असून, त्याचा फायदा तिला होईल. आणि तिला काही तरी शिकण्यास मदत होईल, अशा अनेक कल्पना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मांडण्यात आल्या असून, त्या राबविण्यात देखील आल्या आहेत.

दरम्यान, आता आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत बोलत आहोत. मात्र २०१२ साली जेव्हा या संकल्पना रुजल्या नव्हता. या कल्पना नव्या होत्या. तेव्हा मुंबई ग्राहक पंचायतीने पहिल्यांदा इको फ्रेंडली गणपतीबाबत स्पर्धा लावली होती. घरगुती पातळीवर मी गणपती उत्सव कसा साजरा केला जाईल, अशी ती स्पर्धा होती. यासाठी खुप निकष होते. तेव्हा खुप लोकांनी स्पर्धेत भाग घेऊ , असे सांगितले. मात्र बाजारात असे साहित्य उपलब्ध नाही, असेही त्यांनी सांगितले. मग पंचायतीने दादरमध्ये इको फ्रेंडली गणपती पेठ भरविण्यात आली. तेव्हा असे स्टॉल गोळा करावे लागले. दोन महिन्यात संबंधितांना सक्षम करण्यात आले. २०१२ सालापासून पर्यावरण स्नेही उत्सवाची मोहीम सुरु आहे.

टॅग्स :गणेशोत्सवमुंबईपर्यावरण