Join us

बी.कॉमला सर्वाधिक पसंती, अडीच लाख विद्यार्थी प्रथमवर्ष प्रवेशाच्या स्पर्धेत, आज पहिली गुणवत्ता यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 13:37 IST

Education 2024: मुंबई विद्यापीठाशी संलग्नित, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेण्याकरिता २ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ७० हजार ५९५ एवढे अर्ज सादर केले आहेत. यात सर्वाधिक मागणी बी.कॉमला आहे.

 मुंबई - मुंबई विद्यापीठाशी संलग्नित, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेण्याकरिता २ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी ८ लाख ७० हजार ५९५ एवढे अर्ज सादर केले आहेत. यात सर्वाधिक मागणी बी.कॉमला आहे. बी.कॉम प्रवेशात १.८८ लाख विद्यार्थ्यांनी रस दाखविला आहे. त्याचबरोबर, बी.कॉम (अकाउंट अँड फायनान्स), बीएस्सी आयटी, बीएस्सी कम्प्युटर सायन्स, बीकॉम (मॅनेजमेंट स्टडिज) या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती लाभली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ३ आणि ४ वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या अभ्यासक्रमांकरिता १३ जूनला संध्याकाळी ५ वाजता पहिली गुणवत्ता यादी संबंधित महाविद्यालयांद्वारे जाहीर केली जाणार आहे. २५ मे पासून ही प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी सुरू आहे. विद्यापीठाने केलेल्या वेळापत्रकानुसार व प्रचलित नियमानुसार ही प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयांमार्फत राबवली जाणार आहे. 

सर्वाधिक मागणीचे अभ्यासक्रम (अर्जांनुसार)बी.कॉम    १,८८,३९०बीकॉम (मॅनेजमेंट स्टडिज)    ४१,०५१बीकॉम (अकाउंट अँड फायनान्स)     १,११,८१२बीए     ६०,८२६बीएस्सी आयटी     १,०४,९८४बीएस्सी     ४१,२९२बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स     ६६,१८७बीएएमएमसी (स्वायत्त)     २५,६४०बीकॉम (बँकिंग अँड इन्शुरंस) (स्वायत्त)     १२,९५२बी.कॉम (फायनान्शिअल मार्केट) (स्वायत्त)     २५,१२३बी.एस्सी (बायोटेक्नोलॉजी) (स्वायत्त)     १८,९५३बॅचरल ऑफ मॅनेजमेंट स्टडिज (ई-कॉमर्स) (स्वायत्त)     १४,८६१ 

शाखानिहाय अर्जविद्याशाखानिहाय सादर केलेल्या प्रवेश अर्जांमध्ये सर्वाधिक वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी ४,७५,०७९ एवढे अर्ज असून, विज्ञान विद्याशाखेसाठी २,९२,६०० अर्ज, मानव्यविज्ञान शाखेसाठी १,०२,८२५ एवढे अर्ज सादर करण्यात आले आहेत. 

सर्व महाविद्यालये आणि स्वायत्त महाविद्यालयांनी वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी, तसेच महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी.- डॉ.पूजा रौंदळे, संचालिका, परीक्षा व मूल्यमापन मंडळ. 

नवीन काय?राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व शासन निर्णयानुसार ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ ऑनर्स विथ रिसर्च, पाच वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टीपल एन्ट्री अँड मल्टीपल एक्झिट या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठशिक्षण क्षेत्रशिक्षण