निवडणुकीत काम करणाऱ्यांना मिळणार महिन्याचे मूळ वेतन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 22:46 IST2019-06-02T22:45:45+5:302019-06-02T22:46:11+5:30
लोकसभा निवडणूका यशस्वीपणे पार पडण्यासाठी काम करणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे.

निवडणुकीत काम करणाऱ्यांना मिळणार महिन्याचे मूळ वेतन
मुंबई : लोकसभा निवडणूका यशस्वीपणे पार पडण्यासाठी काम करणा-या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. निवडणूक कक्षाकडे काम केल्याबद्दल नियमित पगाराशिवाय त्यांच्या एक महिन्याच्या मूळ वेतना इतकी रक्कमपरिश्रमिक/ मानधन स्वरुपात परिश्रमिक/ मानधन स्वरुपात दिली जाणार आहे. मात्र त्यासाठी संबंधितांनी थेट निवडणूक कक्षात काम केलेले असणे अनिवार्य आहे. राज्य व जिल्हास्तरावर त्याची विभागणी करण्यात आलेली आहे.
सतराव्या लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात चार टप्यात मतदान झाले. त्या सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विविध शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी, निवडणूक कार्यालयाकडे कार्यरत होते. आचारसंहिता लागू झाल्यापासून ते २७ मेपर्यंत या कार्यालयाकडे काम करीत असलेल्यांना सातव्या वेतन आयोगातील तरतुदीप्रमाणे एप्रिल महिन्याच्या त्यांच्या मूळ वेतनाइतकी रक्कम मानधन स्वरूपात दिली जाणार आहे. त्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी रितसर या कामासाठी नियुक्ती केली गेली असली पाहिजे, त्याच प्रमाणे निवडणूकीच्या काळात पूर्णवेळ त्याठिकाणी कार्यरत असणा-यांना ही रक्कम दिली जाणार आहे. त्यासाठी राज्यस्तर व जिल्हास्तरावर काम करणाºया अधिकाºयांची वर्गनिहाय श्रेणी निश्चित करण्यात आलेली आहे.