भुंकणाऱ्या, कचरा करणाऱ्यांवर सात महिन्यांत 'कोटी'चा बडगा; पालिकेच्या क्लीन अप मार्शलकडून ३.३६ कोटींचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 10:29 IST2024-12-07T10:28:21+5:302024-12-07T10:29:05+5:30

सार्वजनिक ठिकाणी भुंकून, कचरा फेकून अस्वच्छता करणाऱ्यांवर नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेने एक हजार ८७ क्लीनअप मार्शलसह विशेष पथक नेमले आहे.

Bardga of 'crore' in seven months on barkers, litterers; 3.36 crore fine was collected from the clean up marshal of the municipality | भुंकणाऱ्या, कचरा करणाऱ्यांवर सात महिन्यांत 'कोटी'चा बडगा; पालिकेच्या क्लीन अप मार्शलकडून ३.३६ कोटींचा दंड वसूल

भुंकणाऱ्या, कचरा करणाऱ्यांवर सात महिन्यांत 'कोटी'चा बडगा; पालिकेच्या क्लीन अप मार्शलकडून ३.३६ कोटींचा दंड वसूल

मुंबई : मुंबईत सार्वजनिक ठिकाणी भुंकणाऱ्यांसह पसरवणाऱ्यांविरोधात अस्वच्छता कारवाई करण्यासाठी महापालिकेने आता ठिकठिकाणी क्लीन अप मार्शलची नियुक्ती केली असून, त्याद्वारे सात महिन्यांत तीन कोटी ३६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. या निरीक्षकांनी गेल्या मे ते नोव्हेंबरदरम्यान एक लाख १६ हजार ४३३ प्रकरणे नोंदवली आहेत. यामध्ये ए वॉर्ड अर्थात पालिका मुख्यालय असलेल्या फोर्ट परिसरात सर्वाधिक दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी भुंकून, कचरा फेकून अस्वच्छता करणाऱ्यांवर नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेने एक हजार ८७ क्लीनअप मार्शलसह विशेष पथक नेमले आहे.

 यामार्फत ए वॉर्ड परिसरातून ६२ लाख २९ हजार ७१२ रुपये दंडवसुली झाली आहे. त्याखालोखाल एफ उत्तर (अॅण्टॉप हिल, वडाळा) वॉर्डमध्ये २२ लाख ५२ हजार, डी (ग्रँट रोड, नाना चौक) वॉर्डमध्ये १५ लाख ६७ हजार २०० दंड जमा झाला आहे. बी (मशीद बंदर, मोहम्मद अली रोड) वॉर्डमध्ये सर्वांत कमी म्हणजे ३ लाख ६३ हजार ७०० इतक्या दंडाची नोंद झाली आहे.

अर्धी रक्कम पालिकेला

  क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांकडून २०० रुपयांपासून एक हजारांपर्यंत दंड वसूल करण्यात येत आहे. 

या दंडातील अर्धी रक्कम २ संबंधित क्लीन अप मार्शल कंत्राटदाराला, तर अर्धी रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे.

त्यामुळे अस्वच्छते विरोधातील दंडात्मक कारवाईतून पालिकेच्या महसुलात गेल्या सात महिन्यांत दीड कोटीहून अधिक रकमेची भर पडल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

वॉर्ड             दंड वसूल (रुपयांत)
 ए             ६२,२९,७१२            बी              ६३,२९,७१२             सी              ८,३९,२००             डी               १५,६७,२००           ई              ६,५७,०००                 एफ-उत्तर        २२.५२,०००           एफ-दक्षिण       ६.५१,१००             जी-उत्तर          १५,५३,९००             जी-दक्षिण         १२,४४,७००            एच-पूर्व           ४,८२,४००
 

Web Title: Bardga of 'crore' in seven months on barkers, litterers; 3.36 crore fine was collected from the clean up marshal of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.