‘१६ नोव्हेंबरला बँक कर्मचारी संप करणारच’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 07:23 IST2024-10-27T07:23:20+5:302024-10-27T07:23:58+5:30
देविदास तुळजापूरकर म्हणाले, बँकर्स आणि राज्य सरकार यांनी संवेदनशीलता दाखवून बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढला नाही, तर राज्यभरातील सर्व बँक कर्मचाऱ्यांचा १६ नोव्हेंबरचा संप अटळ आहे.

‘१६ नोव्हेंबरला बँक कर्मचारी संप करणारच’
मुंबई : बँक कर्मचाऱ्यांना पुरेसे संरक्षण द्यावे, बँकांतून पुरेशी नोकर भरती करावी आणि बँक कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी आझाद मैदान येथे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने धरणे देण्यात आले. त्यात राज्यभरातून ५०० हून अधिक कर्मचारी, अधिकारी सामील झाले होते.
यावेळी निमंत्रक देविदास तुळजापूरकर म्हणाले, बँकर्स आणि राज्य सरकार यांनी संवेदनशीलता दाखवून बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर तोडगा काढला नाही, तर राज्यभरातील सर्व बँक कर्मचाऱ्यांचा १६ नोव्हेंबरचा संप अटळ आहे.