मुंबई - अवैध बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेचा गैरवापर करून एका बांगलादेशी महिलेच्या घरातून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आरसीएफ पोलिस ठाण्यातील दहशतवादविरोधी पथकाचे एपीआय विजय सुतार, हवालदार योगेश खांडगे तसेच पोलिस शिपाई नेमाडे व मोरे यांना अटक करण्यात आली असून, चौघांनाही निलंबित करण्यात आले आहे. याच गुन्ह्यात गुरुवारी रमेश शेट्टी ऊर्फ रमेश अण्णा या बारमालकालाही अटक करण्यात आली आहे.
चेंबूर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, प्रत्येक आरोपीची भूमिका निश्चित करण्याबरोबरच गहाळ झालेल्या मौल्यवान वस्तूंचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात छाप्यांदरम्यान जप्त वस्तूंचा कोणताही पंचनामा न केल्याने जप्त मालमत्तेचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले. बांगलादेशी नागरिक अस्मा पॉली ही गेल्या १२ वर्षांपासून कौपरखैरने येथे वास्तव्यास असून, ती तुर्भे येथील रमेश बारमध्ये काम करते. २ जानेवारी रोजी अस्मा घरी एकटी असताना साध्या वेशातील एक महिला व काही पुरुष तिच्या घरी आले. आयडीप्रूफ तपासणीच्या नावाखाली ते घरात शिरले. नंतर स्वतः पोलिस असल्याचे सांगून त्यांनी अस्माला गाडीत बसवले आणि तिच्या अनुपस्थितीत घराची झडती घेतली.
प्रकरण दाबण्यासाठी तडजोड?- अस्माने तक्रारीत घरातून सुमारे १५ तोळे सोने व २० ते २५ लाख रुपये रोख चोरीस गेल्याचा आरोप केला आहे. प्रकरण वाढू नये म्हणून पोलिसांनी बारमालक रमेश अण्णा याच्या माध्यमातून तडजोड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. - वेगवेगळ्या टप्प्यांत सुमारे ५ ते ६ लाख रुपये व सोन्याचे दागिने देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी याआधी अस्माच्या मैत्रिणीसोबत केला होता. शर्मिण खातून अत्तर हिच्या कल्याण येथील घरी २५ डिसेंबर रोजी एपीआय सुतार आणि इतर पोलिस गेले. पोलिस कारवाईची भीती घालून त्यांनी तिच्याकडून ५ लाख रुपये घेऊन सोडून दिल्याचा आरोप केला आहे.
Web Summary : Mumbai police officers arrested for robbing a Bangladeshi woman during a search operation. The officers allegedly stole cash and jewelry. A bar owner was also arrested for attempting a compromise to suppress the case.
Web Summary : मुंबई में बांग्लादेशी महिला को तलाशी अभियान के दौरान लूटने के आरोप में पुलिस अधिकारी गिरफ्तार। अधिकारियों ने नकदी और गहने चुराए। मामले को दबाने के लिए समझौता करने के आरोप में बार मालिक भी गिरफ्तार।