Join us
Daily Top 2Weekly Top 5

वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला 'स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू' नाव देण्याचा निर्णय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 22:48 IST

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार' देण्यात येणार आहे, असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला 'स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू' असे नाव देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. याशिवाय, विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार' देण्यात येणार आहे, असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. रविवारी एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, "सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात अनेक कार्यक्रम सुरु आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि समुद्र यांचं नातं आहे. ते लक्षात घेऊन वांद्रे-वर्सोवा या समुद्र सेतुला 'स्वातंत्र्यीवर सावरकर समुद्र सेतू' अशा प्रकारचे नाव देण्याची निर्णय घेतला आहे." याशिवाय, "विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत, शौर्य दाखवणारे आणि संकटातून अनेकांची मुक्तता करणाऱ्यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर वीरता' पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

दरम्यान, मुंबईतील कोस्टल रोडला धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, तर वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल)ला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केली होती. त्यानुसार १४ मे रोजी संभाजी महाराज जयंतीनिमित्त कोस्टला रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले होते. त्यानंतर आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला 'स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू' असे नाव देण्यात आले आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबई