दुबेसह बारा जणांच्या कोठडीबाबत आज होणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 02:40 IST2020-04-21T02:40:31+5:302020-04-21T02:40:38+5:30

वांद्रे स्थानकात गर्दी करणाऱ्या लोकांना भडकवल्याचा आरोपात दुबे आणि तर दंगलप्रकरणी अन्य दहा जण अटकेत

bandra crowd case hearing in court regarding vinay dubeys police custody | दुबेसह बारा जणांच्या कोठडीबाबत आज होणार सुनावणी

दुबेसह बारा जणांच्या कोठडीबाबत आज होणार सुनावणी

मुंबई : वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात मजूर जमाव प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अकरा जणांच्या पोलीस कोठडीबाबत आज मंगळवारी सुनावणी होणार आहे. यात उत्तर भारतीय संघाचा नेता विनय दुबे याचाही समावेश असून तो निर्दोष असल्याचा दावा त्याच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.
वांद्रे स्थानकात गर्दी करणाऱ्या लोकांना भडकवल्याचा आरोपात दुबे आणि तर दंगलप्रकरणी अन्य दहा जणांना अटक करण्यात आली आहे. वांद्रे परिसरात १४ एप्रिल रोजी गर्दी जमवणाºया जवळपास ९०० ते १००० अज्ञात लोकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Web Title: bandra crowd case hearing in court regarding vinay dubeys police custody