Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरएमसीसह लाँड्री आणि फाउंड्रीवरही बंदी!, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 11:00 IST

पवई, चांदिवली परिसरात खैरानी रोडवर मोठया प्रमाणावर कारखाने असून, या कारखान्यांमुळे होणाऱ्या भट्टी प्रदूषणाने स्थानिकांचा श्वास कोंडला आहे.

मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रेडी मिक्स सिमेंट काँक्रीट प्लांटवर कारवाईचे दणके देत आपला रोख लाँड्रीकडेही वळविला आहे. मंडळाने एका रेडी मिक्स काँक्रीट प्लांटसह खैरानी परिसरातील १७ लाँड्री व फाउंड्रीला बंदीचे आदेश बजाविले. ‘लोकमत’ने खैरानी रोडवरील प्रदूषणाचा आढावा घेत स्थानिकांच्या समस्या मांडल्या होत्या. वृत्त प्रसिद्ध होताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने खैरानी रोड परिसरात कारवाई सुरु झाली आहे.पवई, चांदिवली परिसरात खैरानी रोडवर मोठया प्रमाणावर कारखाने असून, या कारखान्यांमुळे होणाऱ्या भट्टी प्रदूषणाने स्थानिकांचा श्वास कोंडला आहे. यासाठी स्थानिकांनी  प्राधिकरणांनी कारवाई करावी, अशी मागणी मंडळाकडे पत्रव्यवहार करत केली होती. प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यात यावी, याकडे चांदिवलीकरांनी लक्ष वेधले होते.

कोणाला काम बंद करण्याचे आदेश लक्ष्मी एंटरप्रायझेस  एम. प्रोसेस  निरमा प्रोसेस  मार्क गार्मेंट प्रोसेस युनिट २  मदिना डायर्स   इलेक्ट्रो प्राइस्ट   आर्या एंटरप्रायझेस   आर.एच. मेटल्स   ब्ल्यू लीफ इंडस्ट्रीज  विकाश फाउंड्री   माझ मेटल इंडस्ट्री  हमिद मेटल वर्कस यू. के. बेस्ट गार्मेटस प्रोसेसर ब्राइट अँड ब्राइट इलेक्ट्रॉनिक्स प्रकाश इंडस्ट्री  रंजना वॉश अँड केअर  जलाराम एंटरप्रायझेस डोगस सोमा जेव्ही (आरएमसी प्लांट)

कामात सुधारणा करण्याचे आदेश टेविन्टि फाइव्ह साऊथ रिॲलिटी लिमिटेड  वन आरएमसी प्लांट प्रायव्हेट लिमिटेड  एफडीसी लिमिटेड  शीतल डाय कास्टिंग

टॅग्स :प्रदूषणमुंबई