"धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या रजा अकादमीवर बंदी घाला"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 02:07 IST2020-10-31T02:07:04+5:302020-10-31T02:07:55+5:30
दहशतवादाविरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तीचा अशा प्रकारे निषेध करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी व असे कृत्य करणाऱ्या रजा अकादमीवर बंदी घालण्याची हिंमत राज्य सरकारने दाखवावी

"धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या रजा अकादमीवर बंदी घाला"
मुंबई : मुंबईतील भेंडी बाजार येथे फ्रान्सच्या पंतप्रधानांचे फोटो रस्त्यांवर लावून भ्याड निदर्शने करणाऱ्या रजा अकादमीचे हे कृत्य देशद्रोही अशा स्वरूपाचेच आहे. दहशतवादाविरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तीचा अशा प्रकारे निषेध करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी व असे कृत्य करणाऱ्या रजा अकादमीवर बंदी घालण्याची हिंमत राज्य सरकारने दाखवावी, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
फ्रान्सच्या पंतप्रधानांच्या विरोधात महाराष्ट्रात रजा अकादमीचे लोक निषेध करीत आहे. यासंदर्भात शिवसेनेची भूमिका काय आहे, हे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सांगावे, असा प्रश्नसुद्धा आमदार भातखळकर यांनी केला आहे.
तसेच चीनमध्ये अल्पसंख्याक समाजावर इतके अत्याचार होती? असताना रजा अकादमी गप्प का होती, असा सवालसुद्धा त्यांनी केला आहे.