Join us  

रिअल इस्टेट बाजारात मारली बाजी; घर खरेदीत महिलांची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 5:43 AM

सर्वेक्षणातील अंदाज

ओंकार गावंड

मुंबई : महिला हल्ली सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहेत. भारतात आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र रिअल इस्टेट बाजारात पुरुषांपेक्षा महिला अधिक गुंतवणूक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बँक, शेअर बाजार किंवा सोन्यात गुंतवणूक करण्यापेक्षा ६२ टक्के महिलांनी घर खरेदी करण्यात पसंती दर्शविली आहे. याउलट ५४ टक्के पुरुष आपले पैसे रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवत आहेत. त्यामुळे आता घर खरेदीत पुरुषांपेक्षा महिलाच आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

ॲनारॉक संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातील हा निष्कर्ष आहे. ॲनारॉकचे संचालक प्रशांत ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार सध्या महिलांनी रिअल इस्टेट क्षेत्रात बाजी मारली असून इतर क्षेत्रांपेक्षा येथे पैसे गुंतविणे त्यांना अधिक सुरक्षित वाटते. 

nघर खरेदी करताना ७१ टक्के महिला या रेडी टू मूव्ह म्हणजेच बांधून तयार असलेल्या घरात राहायला जाणे पसंत करत आहेत. nतर इतर महिला नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घरासाठी गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. nसर्वेक्षणानुसार भारतातील महिला ९० लाखांच्या आसपास किंमत असणाऱ्या घरांना अधिक पसंती दर्शवत आहेत. तर अल्ट्रा लक्झरी घरांसाठी काही महिला २.५ कोटींपर्यंत किंमत मोजण्यासाठीही तयार होत आहेत.

हल्ली महिला केवळ घर सांभाळत नसून घर खरेदीही करीत आहेत. कोरोनाच्या महामारीनंतर बांधकाम क्षेत्रात महिला अधिक गुंतवणूक करत आहेत. स्वतःचे घर असावे असे बहुतांश महिलांचे स्वप्न असते. त्यामुळे इतर ठिकाणी गुंतवणूक करण्यापेक्षा घर खरेदीला त्या अधिक प्राधान्य देतात.- डॉ. निरंजन हिरानंदानी, व्यवस्थापकीय संचालक, हिरानंदानी ग्रुप

४६ टक्के महिलांची ३ बीएचकेला पसंतीभारतीय रियल इस्टेट बाजारात ४६ टक्के महिला ३ बीएचके, ३० टक्के महिला २ बीएचके व १० टक्के महिला ४ बीएचके घराला अधिक पसंती दर्शवत आहेत. प्रधानमंत्री आवाससारख्या सरकारी योजना, स्टॅम्प ड्युटीवर देण्यात आलेली सवलत, विविध राष्ट्रीय बँकांमध्ये महिलांसाठी कर्ज योजना व कमी व्याजदर, तसेच करसवलत या सर्व सोयीसुविधांमुळे महिलांना घर घेणे अधिक सोपे जात असल्याचे निदर्शनास येते. 

टॅग्स :महिलाशेअर बाजारघर