विमानातून उतल्यावर तीस मिनिटांत मिळतेय सामान; मुंबई, दिल्ली, बंगळुरू विमानतळावरील कामकाजात सुधारणा

By मनोज गडनीस | Published: March 30, 2024 05:09 PM2024-03-30T17:09:46+5:302024-03-30T17:14:15+5:30

विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणाऱ्या गर्दीमध्ये प्रवाशांना विमानातून उतरल्यानंतर त्याचे सामान मिळण्यास मोठा विलंब होत होता.

baggage is received within 30 minutes after taking off from the plane improvement in operations at mumbai delhi bangalore airports | विमानातून उतल्यावर तीस मिनिटांत मिळतेय सामान; मुंबई, दिल्ली, बंगळुरू विमानतळावरील कामकाजात सुधारणा

विमानातून उतल्यावर तीस मिनिटांत मिळतेय सामान; मुंबई, दिल्ली, बंगळुरू विमानतळावरील कामकाजात सुधारणा

मनोज गडनीस, मुंबई : विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणाऱ्या गर्दीमध्ये प्रवाशांना विमानातून उतरल्यानंतर त्याचे सामान मिळण्यास मोठा विलंब होत होता. मात्र, ब्यूरो ऑफ सिव्हील एव्हीएशन सिक्युरिटीने विमानातून उतरल्यानंतर प्रवाशांना तीस मिनिटांच्या आत त्यांचे सामान मिळावे असे निर्देश जारी केल्यानंतर आता मुंबई, दिल्ली व बंगळुरू येथील विमानतळावर या संदर्भातील कामकाजात सुधारणा दिसून आली आहे.

विमान प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे देशातील प्रमुख विमातळावर प्रवाशांना त्यांचा सामान मिळण्यास विलंब होत होता. त्यामुळे प्रत्यक्ष विमानतळावर लोकांची गर्दी देखील वाढत होती. यानंतर ब्यूरो ऑफ सिव्हील एव्हीएशन सिक्युरिटीने विमान कंपन्यांना ही प्रक्रिया जलदगतीने राबविण्याचे निर्देश दिले. यानुसार, विमानतळावर विमान दाखल झाल्यानंतर विमानाने इंजिन बंद केल्यापासून दहाव्या मिनिटाला प्रवाशांचे सामान कन्व्हेअर बेल्टवर यायला हवे, असे निर्देश दिले. तसेच, ३० मिनिटांच्या आत प्रवाशाला सामान मिळून तो बाहेर पडला पाहिजे, अशी व्यवस्था करण्यास सांगितले. त्याची अंमलबजावणी आता मुंबईसह दिल्ली व बंगळुरू येथे देखील प्राधान्य क्रमाने झाली आहे.

Web Title: baggage is received within 30 minutes after taking off from the plane improvement in operations at mumbai delhi bangalore airports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.