सीबीआयचे वकील ठाण्यात उलगडणार 1993 च्या बाँम्ब स्फोटाचे रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 17:08 IST2017-10-04T17:00:41+5:302017-10-04T17:08:33+5:30
1993 मध्ये मुंबईत झालेल्या बाँम्बस्फोच्या "आखो देखा हाल " च्या अहवालाची बित्तंबातमी सीबीआयचे यशस्वी जेष्ठ वकील दिपक साळवी ठाणेकरांसमोर व्यक्त करणार आहे. यासाठी साळवी यांची मुलाखत व सत्कार समारंभ नौपाडा, गोखले रोडवरील मराठी ग्रंथसंग्रहालयात 7 आँक्टोबरला सायंकाळी 6 वा. पार पडणार आहे.

सीबीआयचे वकील ठाण्यात उलगडणार 1993 च्या बाँम्ब स्फोटाचे रहस्य
ठाणे - 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बाँम्बस्फोच्या "आखो देखा हाल " च्या अहवालाची बित्तंबातमी सीबीआयचे यशस्वी जेष्ठ वकील दिपक साळवी ठाणेकरांसमोर व्यक्त करणार आहे. यासाठी साळवी यांची मुलाखत व सत्कार समारंभ नौपाडा, गोखले रोडवरील मराठी ग्रंथसंग्रहालयात 7 आँक्टोबरला सायंकाळी 6 वा. पार पडणार आहे.
या बाँम्ब स्फोटातील आरोपिंना फाशी व जन्मठेपेची शिक्षा भोगायला भाग पाडणारे व या स्फोटातील म्रुताना व जखमीना न्याय मिळवून देणारे जेष्ठ वकील साळवी यांनी या बाँम्ब स्फोट खटल्याची न्यायालयीन लढाई यशस्विरित्या जिंकली आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयात सादर केले ठोस पुरावे , त्यावर त्यांनी केलेला समर्पक युक्तीवाद आदींचा रोमहर्षक , चित्तथरारक यशस्वी न्यायालयीन लढाईचा इतिहास खास त्यांच्या शैलित ठाणेकरांना एेकण्याची संधी आहे. या कार्यक्रमासाठी अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित ऱाहणार आहेत. या कार्यक्रमाया लाभ ठाणेकरानी मोठ्यासंख्येने घेण्याचे आवाहन विचार व्यासपीठचे खंद्दे पुरस्कर्ते संजय ब्रहमे, अभय मराठे, महेंद्र मोने आणि मकरंद मुळे यांनी केले आहे.