Join us  

हतबल मुख्यमंत्र्यांकडून राज्याची प्रतिमा खराब; भाजपाने केली उद्धव ठाकरेंवर जहरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 4:55 PM

तसेच मुख्यमंत्री या नात्याने राज्यासमोरच्या समस्या सोडविण्याचे आव्हान आत्मविश्वासाने पेलण्याच्या ऐवजी उद्धव ठाकरे सत्तेच्या पहिल्या दोन महिन्यातच हतबलता व्यक्त करतात

मुंबई - राज्याची आर्थिक परिस्थिती हे मोठे आव्हान असून पैशाचे सोंग करता येत नाही, अशी हतबलता मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी मंगळवारच्या मुलाखतीत व्यक्त केल्यामुळे राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून त्याचा विपरित परिणाम राज्यात नवी गुंतवणूक येण्यावर आणि रोजगार निर्मितीवर होणार आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी मंगळवारी केली.

याबाबत बोलताना माधव भांडारी बोलले की, राज्यात नवी गुंतवणूक येण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे सबळ व सक्षम चित्र निर्माण होणे गरजेचे असताना मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे हतबलता व्यक्त करतात. २०१४ रोजी केंद्रात आणि राज्यात परिवर्तन झाल्यानंतर चुंबकीय शक्ती निर्माण झाली आणि राज्यात मोठ्या प्रमाणात नवे उद्योग येण्यासाठी एमओयू झाले असे त्यांनी मुलाखतीत मान्य केले आहे. पण उद्योग परत गेले असे सांगून त्यांनी आपल्याच शिवसेनेकडे असलेल्या उद्योग खात्याचे अपयशही सांगितले आहे. एमआयडीसी ओस पडल्या आहेत, असे ते म्हणतात, त्यावेळीही त्यांच्या पक्षाचे नेते सुभाष देसाई उद्योगमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण अपयशी ठरल्याचेच ते कबूल करतात असे निराशाजनक आणि हतबल चित्र मुख्यमंत्रीच मांडत असताना राज्यात नवी गुंतवणूक कशी येणार, असा सवाल भाजपाने उपस्थित केला. 

तसेच मुख्यमंत्री या नात्याने राज्यासमोरच्या समस्या सोडविण्याचे आव्हान आत्मविश्वासाने पेलण्याच्या ऐवजी उद्धव ठाकरे सत्तेच्या पहिल्या दोन महिन्यातच हतबलता व्यक्त करतात आणि आपल्या अपयशाचे खापर इतर कोणावर तरी फोडू पाहतात हे आश्चर्यकारक आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत दिली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनीच स्वतः मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यापूर्वी सांगितले होते. पण आता राज्याच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर दोन महिने पूर्ण झाले तरी ते आता ही मदत देण्याचे नाव काढत नाहीत. उलट केंद्राकडून पैसे मिळाले तर शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देता येतील, असा उधारीचा वादा करतात. त्यांनी मुळात पंचवीस हजाराचे वचन केंद्र सरकारच्या भरवशावर दिले होते का, हे त्यांनी आधी सांगितले पाहिजे. कर्जमाफीचाही त्यांनी उधारीचा वादा केला असून आता आपण दोन महिने मुदत मागितल्याचे त्यांनी मान्य केले आहे असा टोला भाजपाने उद्धव ठाकरेंना लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

'जामिया'मध्ये पुन्हा एकदा तणाव; 'गोली मारो' घोषणा देत विद्यापीठात घुसला मोठा जमाव 

…अन्यथा पोलीस स्टेशनसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार: किरीट सोमय्या

...म्हणून राष्ट्रवादीसोबत आहे; हीच ती वेळ म्हणत भाजपा आमदाराच्या ट्विटने माजली खळबळ

'तिथीचा हट्ट सोडा, १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करा'; राष्ट्रवादी नेत्याचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

BMC Budget 2020 : शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर; महापालिका ICSC, CBSE  शाळा उघडणार

 

टॅग्स :मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेसुभाष देसाईगुंतवणूकराज्य सरकारशिवसेना