मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य शूटर शिवकुमार गौतम याच्या पोलिस कोठडीत दंडाधिकारी न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.
शिवकुमार गौतम याने सिद्दीकी यांच्यावर ज्या शस्त्राने गोळीबार केला ते शस्त्र अद्याप सापडलेले नाही.
तसेच शिवकुमार तपासासाठी सहकार्य करत नाही. त्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयाला केली होती.
न्यायालयात हजर
मुंबई क्राइम ब्रँचने उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सबरोबर केलेल्या संयुक्त कारवाईत १० नोव्हेंबर रोजी बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या शिवकुमार गौतम याला अटक केली.
त्याच्यासह अनुराग कश्यप, आकाश श्रीवास्तव, ज्ञानप्रकाश त्रिपाठी आणि अखिलेंद्र प्रताप यांनाही अटक करण्यात आली.
सर्व आरोपींची पोलिस कोठडी मंगळवारी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने शिवकुमार याच्या पोलिस कोठडीत २३ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली.