Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बात घमंड की नहीं, इज्जत की है, तो हमने रास्ते बदल दिए’; राहुल कनाल शिंदे गटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 07:09 IST

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल कनाल यांना शाल आणि पक्षाचा झेंडा देऊन त्यांचे स्वागत केले. 

मुंबई : ‘बात घमंड की नहीं, बात इज्जत  की है, लोगो ने अपने लहेजे बदल दिए, तो हमने रास्ते बदल दिए’ असा शेर मारत ठाकरे गटावर निशाणा साधत आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू राहुल कनाल यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल कनाल यांना शाल आणि पक्षाचा झेंडा देऊन त्यांचे स्वागत केले. 

कोविड काळात मुख्यमंत्री शिंदे यांच्या सहकार्याने आम्ही खूप काम केले. पण पक्षातील दोन-तीन लोकांनी खूप वाईट राजकारण केले, मला पक्षाने खूप काही दिले. त्याच्या हजार पटीने मी देखील दिले, असे राहुल कनाल यांनी स्पष्ट केले. सुशांतसिंग राजपूत किंवा दिशा सालियन प्रकरणात आपल्यावर आरोप झाला. पण या प्रकरणाचा तपास सुरू करा आणि यात दोषी आढळलो तर तुमची चप्पल आणि माझे डोके असेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :एकनाथ शिंदेआदित्य ठाकरे