Join us  

'सार्वजनिक स्थळांचा 'शिवाजी असा एकेरी उल्लेख टाळून 'छत्रपती शिवाजी महाराज' नामकरण करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 10:51 AM

संभाजी महाराजांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे

मुंबई - मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे आणि कोल्हापुरातील 'शिवाजी विद्यापीठासाहित' महाराष्ट्रातील सर्वच सार्वजनिक स्थळांचे नामकरण हे 'छत्रपती शिवाजी महाराज' असे करणे अशी मागणी भाजपा खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. 

संभाजी महाराजांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे त्यात म्हटलंय की, महाराष्ट्रातील जनमानसात छत्रपती शिवाजी महाराजांचे किती मोठे स्थान आहे हे आपणांस माहितच आहे. काही दिवसांपासून महाराजांच्या नाम उच्चारावरुन मोठी चर्चा होत आहे. मग ते अमिताभ बच्चन प्रकरण असो वा केंद्रीय रवीशंकर प्रसाद यांच, त्या दोन्ही वेळी शिवभक्तांची बाजू देत जाब विचारत होता मात्र यावर कायमस्वरुपी उपाय योजना करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितले. 

तसेच सुरुवात आपण सर्व सार्वजनिक स्थळांचे नामविस्तार करणे आवश्यक आहे. ज्यांचे नाव केवळ शिवाजी असे आहे अशी मागणी संभाजी महाराजांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याचसोबत मराठा आरक्षणाकरिता जनता रस्त्यावर उतरुन लढली. त्यात अनेक ठिकाणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अनेक आंदोलकांवर विनाकारण गुन्हे नोंदवले गेले आहेत. याबाबत गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. 

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. तसेच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनंतर धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. 

राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदाराने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील दलितांवरील गुन्हेही माफ करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे ही मागणी गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर केली जात होती. याबाबतचे पत्रच प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले असून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे. आता मराठा आरक्षणातील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी संभाजी महाराजांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मागणी केली.  

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीछत्रपती शिवाजी महाराजशिवसेनाउद्धव ठाकरेमराठा