संकटसमयी राजकारण टाळायला हवे - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 01:54 AM2020-04-16T01:54:06+5:302020-04-16T01:54:16+5:30

शरद पवार; सीआरएस फंड मुख्यमंत्री निधीला उपलब्ध करुन द्या

Avoid politics in times of crisis - Sharad Pawar | संकटसमयी राजकारण टाळायला हवे - शरद पवार

संकटसमयी राजकारण टाळायला हवे - शरद पवार

Next

मुंबई : राजकारणात संघर्ष नेहमी असतो. पण आज देशावर संकट आहे. एकमेकांच्या विरोधात संघर्ष करण्याची ही वेळ नाही. राज्यात अथवा केंद्रात कुठल्या पक्षाचे सरकार आहे हे आज महत्त्वाचे नाही. सगळ्यांनी मिळून कोरोनाचा पराभव करु या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पवार यांनी बुधवारी संवाद साधला. ते म्हणाले, आरबीआयने परिपत्रक जारी न करता आदेश दिले पाहिजेत. आदेशाशिवाय बँका निर्णयाची अंमलबजावणी करणार नाहीत. त्यानंतर राष्ट्रीयीकृत बँकांनी पुढाकार घेऊन उद्योजकांना, राज्यसरकारला मदतीचा हात दिला पाहिजे. केंद्र सरकार सीएसआर फंड वापरत आहे. ती रक्कम राज्याच्या मुख्यमंत्री रिलिफ फंडाला उपलब्ध करून दिला पाहिजे. पंतप्रधान रिलिफ फंडाला जशी मदत होते तशी मदत मुख्यमंत्री रिलिफ फंडाला उपलब्ध करून दिली तर राज्याला या कामाला मदत होणार आहे असेही पवार यांनी सांगितले.
उद्योग बंद आहेत त्याचाही परिणाम मोठा झाला आहे. बँकेचे व्याज वाढतेय, कामगारांचा पगार वाढतोय, उत्पन्न नाहीय. त्यामुळे छोटो-मोठे उद्योजक अडचणीत सापडले आहेत. त्याशिवाय आणखी एक संकट पुढे आले आहे ते म्हणजे बेकारी, बेरोजगारी. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढेल अशी चिन्हे दिसत आहेत, अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली आहे.

बाजारपेठ नसल्याने शेतकरी अडचणी

शेती असो किंवा शेतीत जे पिकले त्याला बाजारपेठ नाही. मुंबईसारखी एपीएमसी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा उपयोग होईल पण राज्यात अनेक ठिकाणी मालाला मार्केट नाही. त्यामुळे हातातील पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

Web Title: Avoid politics in times of crisis - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.