Aunda bhukka-bread in the capital's passengers | राजधानीतील प्रवाशांना आवडेना झुणका-भाकरी
राजधानीतील प्रवाशांना आवडेना झुणका-भाकरी

- कुलदीप घायवट 

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना झुणका-भाकर देण्याची योजना आखण्यात आली होती. यासाठी झुणका-भाकर देण्याच्या योजनेची चाचणी केली जात होती. मात्र चाचणी अपयशी ठरल्याने ही योजना गुंडाळण्यात आली आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीनपर्यंत पहिली राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. महाराष्ट्रातून मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक, भुसावळ, जळगाव या जिल्ह्यांमधून एक्स्प्रेस जात असल्याने येथील प्रवाशांना आणि उत्तर भारतीय प्रवाशांना महाराष्ट्रीय पदार्थांची चव चाखता यावी यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) यांच्या वतीने झुणका-भाकर आणि वांग्याचे भरीत देण्याची योजना आखण्यात आली. यासाठी आयआरसीटीसीकडून चाचण्या घेतल्या गेल्या. यासाठी प्रवाशांना बेसनाचा झुणका आणि ज्वारीची भाकरी चवीसाठी देण्यात आली. त्याची चव कशी लागते, यावर प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेण्यात येत होत्या. या प्रतिक्रियांच्या सखोल अभ्यास आयआरसीटीकडून केला गेला. चाचण्यांमध्ये प्रवाशांच्या सूचनांच्या समावेश केला होता.
>घरचे खाणे
प्रवासात नको
महाराष्ट्रातील प्रवाशांना प्रवासात महाराष्ट्रीय पदार्थ खाणे पसंत होत नव्हते. कारण घरीदेखील हेच पदार्थ खाल्ले जातात, त्यामुळे दिल्लीच्या प्रवासात महाराष्ट्रातील प्रवाशांना झुणका, भाकरी, भरताची उत्सुकता नसल्याचे दिसून आले, असे आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.


Web Title: Aunda bhukka-bread in the capital's passengers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.