Join us
Daily Top 2Weekly Top 5

सी लिंकवरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 13:25 IST

सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास खारचे रहिवासी असलेले मकिजा सी लिंकवर आले. सी लिंकवर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या रक्षकांनी मकिजा यांना हटकले. मात्र, ते पुढे येणार तोच मकिजा यांनी समुद्रात उडी घेतली.

मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंकवरून एका व्यक्तीने खोल समुद्रात उडी मारल्याची घटना सोमवारी घडली. टिकम लक्ष्मणदास मकिजा (५६) असे या व्यक्तीचे नाव असून, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. या प्रकरणी वरळी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास खारचे रहिवासी असलेले मकिजा सी लिंकवर आले. सी लिंकवर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या रक्षकांनी मकिजा यांना हटकले. मात्र, ते पुढे येणार तोच मकिजा यांनी समुद्रात उडी घेतली. सुरक्षारक्षकांनी लगेचच ही माहिती वरळी पोलिसांना दिली. त्यानंतर, पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनखाली पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यासाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. मात्र, मकिजा सापडले नाहीत. नौदलाच्या बोटीही मकिजा यांचा शोध घेत होते. 

तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात मकिजा यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यानंतर, ते नैराश्येत गेले. त्यांनी यापूर्वीही कुटुंबीयांकडे जीवन संपविण्याबाबत वक्तव्य केल्याचे चौकशीत समोर आले. 

टॅग्स :मुंबईपोलिस