Join us

अभिनेत्री पायल घोषसह आठवले राज्यपालांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 06:00 IST

घोषने अनुराग कश्यपविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. याबाबत पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली.

मुंबई : अभिनेत्री पायल घोषला सुरक्षा मिळावी, तसेच तिने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी पायल घोषही उपस्थित होती.

घोषने अनुराग कश्यपविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. याबाबत पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, आठ दिवस उलटूनही तक्रारीवर कारवाई झालेली नसल्याचा आरोप आठवले यांनी केला. या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी राज्यपाल कोश्यारी यांची आठवले आणि घोष यांनी भेट घेतली. राज्यपालांनी घोष हिला सुरक्षा मिळेल, याबाबत आश्वस्त केल्याचे आठवले यांनी भेटीनंतर सांगितले.

टॅग्स :गुन्हेगारीरामदास आठवले