लेकीवर अंत्यसंस्कार तरी करू द्या; अवशेषांची अद्यापही प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 11:03 IST2023-11-24T11:03:06+5:302023-11-24T11:03:58+5:30

श्रद्धा वालकरच्या हतबल पित्याची आर्त साद, अवशेषांची प्रतीक्षाच

At least let Lekki be cremated; Waiting for the remains, shradha walkar murder case | लेकीवर अंत्यसंस्कार तरी करू द्या; अवशेषांची अद्यापही प्रतीक्षाच

लेकीवर अंत्यसंस्कार तरी करू द्या; अवशेषांची अद्यापही प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : दिल्लीसह संपूर्ण देश हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला एक वर्ष उलटूनही तिच्या वडिलांना तिच्या शरीराचा एकही अवशेष अजून मिळालेला नाही. लेक गमावलीच, मात्र वर्षभरानंतरही तिच्यावर अजून अंत्यसंस्कार करता आलेले नाहीत, अशी व्यथा तिचे वडील विकास वालकर यांनी मांडली आहे.

वसईतील २८ वर्षीय श्रद्धाची तिचा लिव्ह इन रिलेशनशिपमधील प्रियकर आफताब पुनावाला याने दिल्लीत निर्घृण हत्या केली होती. तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले आणि ते गुडगावच्या जंगलात फेकून 
दिले होते. मे महिन्याच्या दरम्यान त्याने हे कृत्य केले. या प्रकरणाला १४ नोव्हेंबर २०२२ला वाचा फुटली हाेती. 

आफताबला फासावर चढविण्याची मागणी

लाडात वाढलेली श्रद्धा, तिला मी बाप म्हणून कधी एक बोट लावले नव्हते. माझ्या मुलीची झालेली दयनीय अवस्था पाहून मन अस्वस्थ होते. तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून फेकून दिले होते. 

बाप म्हणून मला हे सांगताना तीव्र वेदना होत आहेत. मात्र, असे क्रूर कृत्य करणाऱ्या आफताब पुनावाला याला कठोरातील कठोर शिक्षा देत कोणतीही दया न दाखवता फासावर चढविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. श्रद्धाला जशा वेदना झाल्या तशाच वेदना आरोपी आफताब याला फासावर चढवून द्याव्यात, अशी विनंती श्रद्धाच्या आजीने केली आहे.

Web Title: At least let Lekki be cremated; Waiting for the remains, shradha walkar murder case