पालिकेच्या सहायक अभियंत्याला मारहाण, सांताक्रुझमधील घटना; एक ताब्यात, चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 14:47 IST2025-11-01T14:47:10+5:302025-11-01T14:47:10+5:30
शिवीगाळ करून बंडगर यांची कॉलर पकडली आणि श्री मुखात मारली

पालिकेच्या सहायक अभियंत्याला मारहाण, सांताक्रुझमधील घटना; एक ताब्यात, चौघांवर गुन्हा
मुंबई : रस्त्याच्या पाहणीदरम्यान महापालिकेच्या एच पूर्व विभागातील रस्ते विभागाच्या सहायक अभियंत्याला चौघांनी मारहाण केल्याची घटना सांताक्रुझ पूर्वेकडील कलिना व्हिलेज परिसरात गुरुवारी घडली आहे. सचिन बंडगर (४३) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी राजा कुरेशी (४२) याला ताब्यात घेतले असून, त्याच्यासह चौघांवर गुन्हा नोंदवला आहे.
बंडगर गुरुवारी दुपारी दुय्यम अभियंता भूषण बधान, प्रीतम माने, साइट अभियंता बच्चन शहा आणि विशाल एआय इमेज महाले यांच्यासह कलिना व्हिलेज मार्ग येथील रस्त्याची पाहणी करत होते. त्याचवेळी पोद्दार जम्बो किड्स शाळेतील एका महिला कर्मचाऱ्याने तळमजल्याला गळती लागण्याची शक्यता असल्याने पाहणी करण्याची विनंती केली. यावेळी अधिकाऱ्यांनी तळमजल्याला कोणतेही नुकसान होणार नाही, याची शाश्वती दिली.
आरोपीला पोलिसांनी अटक न केल्यामुळे शुक्रवारी अभियंते, कर्मचारी वाकोला पोलिस ठाण्याजवळ जमा झाले. २४ तासांत कारवाई न झाल्यास काम बंद केले जाईल, असा इशारा म्युनिसिपल इंजिनीअर्स असो. चे अध्यक्ष रमेश भुतेकर यांनी दिला.
कामाची परवानगी मागत आडकाठी
काही वेळाने त्या महिलेचा पती कुरेशी हा तेथे आला आणि त्याने पालिका अधिकाऱ्यांना परवानगी विषयी प्रश्न विचारत वाद घालण्यास सुरुवात केली. 'कामाची परवानगी दाखवा, नाहीतर मी काम करू देणार नाही,' अशी धमकी त्याने दिल्याचे बंडगर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याने शिवीगाळ करून बंडगर यांची कॉलर पकडली आणि श्री मुखात मारली. यावेळी इतर तिघांनीही धक्काबुक्की केली.