मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे, मिलिंद म्हैसकर यांची नावे आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 07:02 IST2026-03-29T07:02:17+5:302026-03-29T07:02:36+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाला देणार संधी?

Ashwini Bhide and Milind Mhaiskar Emerge as Frontrunners for the Post of Mumbai Municipal Commissioner | मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे, मिलिंद म्हैसकर यांची नावे आघाडीवर

मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे, मिलिंद म्हैसकर यांची नावे आघाडीवर

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. मिलिंद म्हैसकर यांची नावे आघाडीवर आहेत. 

या पदाच्या शर्यतीत महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे,  एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांचीही नावे आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांचेही नाव यासंदर्भात घेतले जात होते; पण, चालू वर्षाअखेर त्या दिल्लीत महत्त्वाच्या पदावर प्रतिनियुक्तीने जाऊ शकतात. 

 अश्विनी भिडे किंवा मिलिंद म्हैसकर यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. भिडे या १९९५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत तर म्हैसकर हे १९९२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यापैकी कोणाला संधी देतात हे महत्त्वाचे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून ते अंतिम निर्णय घेतील. शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे आणि मुंबई महापालिकेत त्यांचा पक्ष भाजपसोबत सत्तेत आहे. या दोन्ही कारणांनी त्यांची संमती फडणवीस घेतील. 

अश्विनी भिडे या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव आहेत आणि त्यांच्याकडे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालकपददेखील आहे. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातच पुढेही जबाबदारी द्यायची आणि सोबत मेट्रोचीही सूत्रे त्यांच्याकडे ठेवायची, असे ठरले तर मिलिंद म्हैसकर यांचे नाव समोर येऊ शकते. भिडे या मुख्यमंत्री कार्यालयात असल्या तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वेळोवेळी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. ‘मेट्रो वूमन’ असा भिडे यांचा 
लौकिक आहे.
 

Web Title : मुंबई नगर निगम आयुक्त पद के लिए अश्विनी भिडे, मिलिंद म्हैसकर सबसे आगे।

Web Summary : अश्विनी भिडे और मिलिंद म्हैसकर मुंबई के नगर निगम आयुक्त पद के लिए प्रमुख दावेदार हैं। अन्य दावेदारों में विकास खारगे और संजय मुखर्जी शामिल हैं। अंतिम निर्णय मुख्यमंत्री फडणवीस शिंदे और पवार से परामर्श के बाद लेंगे। भिडे का मेट्रो अनुभव एक महत्वपूर्ण कारक है।

Web Title : Ashwini Bhide, Milind Mhaiskar frontrunners for Mumbai Municipal Commissioner post.

Web Summary : Ashwini Bhide and Milind Mhaiskar are leading candidates for Mumbai's Municipal Commissioner. Other contenders include Vikas Kharge and Sanjay Mukherjee. The final decision rests with Chief Minister Fadnavis, after consulting with Deputy CMs Shinde and Pawar. Bhide's metro experience is a key factor.