Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 15:48 IST

Siraj Zanai Bhosale Asha Bhosale Funeral: क्रिकेटर मोहम्मद सिराजने भावनिक होत आशाताईंना दिला अखेरचा निरोप

Siraj Zanai Bhosale Asha Bhosale Funeral: भारतीय संगीत क्षेत्रातील महान गायिका आशाताई म्हणजेच आशा भोसले यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. आशा भोसले यांच्यावर सोमवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार होण्याआधी त्यांचे पार्थिव मुंबईत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने आशाताईंना अखेरचा निरोप दिला. यावेळी आशाताईंची नात जनाई हिला सिराजने धीर दिला.

मोहम्मद सिराज आणि जनाई भोसले यांच्याबद्दल गेल्या दोन-तीन वर्षात अनेक चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर सुरुवातीला सिराजकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. पण नंतर सोशल मीडियावर विचित्र गोष्टी बोलल्या जाऊ लागल्याने जनाईने आपल्या मुलाखतीतून स्पष्टपणे त्यांच्या नात्याबद्दल सांगितले. सिराज हा जनाईचा मानलेला भाऊ आहे असे तिने सांगितले. इतकेच नव्हे तर रक्षाबंधनला तिने सिराजला राखी बांधल्याचा फोटोही पोस्ट केला होता. त्यामुळे सिराज आणि जनाई यांच्यातील पवित्र नात्याबाबत स्पष्टता आली. त्यानंतर आज आशा भोसले यांच्या निधनानंतर सिराज आवर्जुन जनाईला आणि कुटुंबीयांना धीर देण्यासाठी आला. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला.

'क्रिकेटचा देव' सचिनही झाला भावूक

सचिन तेंडुलकर आशाताईंच्या पार्थिवाचे दर्शन घेताना अत्यंत व्याकुळ झालेला दिसला. त्यांच्या निधनाने सचिनला इतका धक्का बसला की त्याला सर्वांसमोर रडू कोसळले. सचिन तेंडुलकर आशा भोसले यांना आपली आजी मानत असे. अनेक मुलाखतींमध्ये त्याने आशाताईंनी त्याच्यासाठी बनवलेल्या जेवणाचा आणि त्यांच्यातील गप्पांचा उल्लेख केला. आशाताईंनी सचिनच्या अनेक ऐतिहासिक खेळींचे नेहमीच कौतुक केले होते. त्यामुळे आपल्या मातृतुल्य व्यक्तिमत्वाला निरोप देताना सचिन भावनिक झाल्याचे दिसून आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mohammed Siraj consoles Janai Bhosale, Asha Bhosle's granddaughter, at funeral.

Web Summary : Indian singer Asha Bhosle passed away at 92. Cricketer Mohammed Siraj, considered Janai's brother, consoled her at the funeral. Sachin Tendulkar, who considered Asha Bhosle his grandmother, was also present and emotional.
टॅग्स :आशा भोसलेमोहम्मद सिराजमृत्यूमृत्यू