Join us

जसे स्टेशन पूर्ण होणार; तशी मेट्रो पुढे सरकणार! आरे ते बीकेसी मार्गावर मेट्रो धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 12:02 IST

दक्षिण मुंबईला पूर्व आणि पश्चिम उपनगराशी जोडणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे.

मुंबई :

दक्षिण मुंबईला पूर्व आणि पश्चिम उपनगराशी जोडणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. आता नव्या वर्षात पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे आरे ते बीकेसी या मार्गावर मेट्रो धावेल, असा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केला आहे.

बीकेसीनंतर पुढील स्थानकांचे काम जसजसे पूर्ण होईल; त्या त्या वेगाने मेट्रो पुढचे स्थानक देखील गाठेल व प्रवाशांना विस्तारित असा प्रवास करता येईल, असा विश्वास देखील प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.

पॅकेज एक स्थानके : कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौकपॅकेज दोन स्थानके : काळबादेवी, गिरगाव, ग्रँटरोडपॅकेज तीन स्थानके : मुंबई सेंट्रल, सायन्स म्युझियमपॅकेज चार स्थानके : सिध्दिविनायकदादर, शीतलादेवीपॅकेज पाच स्थानके : धारावी, बीकेसी, विद्यानगरीपॅकेज सहा सीएसएमटी  सहार, छत्रपती सीएसएमटी विमानतळपॅकेज सात स्थानके : मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झपहिला टप्पा : आरे ते बीकेसी, दुसरा टप्पा : बीकेसी ते कफ परेड

३१४ किलोमीटर मेट्रोच्या निर्माण होणाऱ्या जाळ्यामुळे मुंबईतील ३० ते ४० लाख वाहने कमी होतील.१.१० कोटी नागरिक सध्या सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतात.१ कोटी  प्रवासी २०३१ पर्यंत मेट्रोने प्रवास करतील.५२% लोकलने प्रवास करतात.२६% बसने प्रवास करतात.

 

टॅग्स :मेट्रोमुंबई