Join us
Daily Top 2Weekly Top 5

भावना गवळी शिंदे गटात जाताच त्यांचे घटस्फोटीत पती मातोश्रीवर; शिवसेना प्रवेशावेळी म्हणाले...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 15:51 IST

Bhavna Gavli: भावना गवळींचे घटस्फोटीत पती प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रशांत सुर्वे यांनी आज मातोश्रीवर येत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. अनेक आमदारांसह खासदारा तसेच आजी-माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल होत आहेत. तर काही आमदारांसह मोजकीच मंडळी उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेत राहिली आहे. मात्र शिंदे गटात दाखल होत असलेल्या काही नेत्यांच्या कुटुंबातील काही सदस्य मात्र उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र आता भावना गवळींचे घटस्फोटीत पती प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रशांत सुर्वे यांनी आज मातोश्रीवर येत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला.

भावना गवळी आणि प्रशांत सुर्वे यांचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. भावना गवळी ह्या राजकारणात सक्रीय आहेत. मात्र प्रशांत सुर्वे हे सक्रिय राजकारणात नव्हते. दरम्यान, राज्यात घडलेली राजकीय उलथापालथ आणि भावना गवळींनी शिंदे गटात केलेले प्रवेश या पार्श्वभूमीवर प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रशांत सुर्वे यांनी मातोश्रीवर दाखल होत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांन पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. तसेच त्यांच्या हाती शिवबंधन बांधले.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रशांत सुर्वे म्हणाले की, भावना गवळी ह्या शिंदे गटात दाखल झाल्या त्याबद्दल मी फार काही बोलणार नाही. सध्या त्या वाशिमच्या खासदार आहेत. आमच्यात जे काही नातं होतं ते १०-१२ वर्षांपूर्वी संपलं आहे. आता मी आणि माझं कुटुंब वाशिमलाही राहतो. माझ्या सेवेचा मोठा काळ हा दिल्ली आणि मुंबईत गेलाय. पण मी मूळ वाशिमचा असल्याने आमची शेतीवाडी, व्यवसाय वाशिम येथे आहे. 

टॅग्स :भावना गवळीशिवसेनाउद्धव ठाकरे