लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: मुंबईत गेल्या दहा वर्षात रस्ते अपघातात ४ हजार १९८ जणांचा बळी गेला असून गेल्या वर्षी ३६३ जणांचा यामध्ये समावेश आहे. २०१६ च्या तुलनेने मृतांचा आकडा १९९ ने कमी झाला आहे. वाहतूक पोलिसांनी अपघाताच्या नेमक्या कारणांचा आढावा घेत त्यानुसार केलेल्या उपाययोजनांमुळे अपघाताचे प्रमाण घटल्याचे स्पष्ट होत आहे.
ड्रंक अँड ड्राइव्ह, वाहतूक नियमांचे उल्लंघन, बेदरकारपणे वाहन चालवणे, चुकीच्या बाजूने ओव्हरटेक केल्यामुळे मृत्यूच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. २०१६ मध्ये अपघाताच्या ३.३७९ घटनांमध्ये ५६२ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या काळात लॉकडाउनच्या निर्बंधामुळेही २०१९ पासून रस्ते अपघातातांचे प्रमाण कमी झाले आहे. २०२५ मध्ये हाच अपघाताचा आकडा कमी होत २,६४५ वर पोहोचला असून ३६३ जणांचा मृत्यू झाला.
अनेक अपघातात वाहनचालक आणि प्रवाशांपेक्षा जखमी किंवा मृत्युमुखी होण्यामध्ये पादचाऱ्यांची संख्या अधिक असते. पादचाऱ्यांना सुखरूप प्रवास करता यावा, यासाठी उपाययोजना पोलिसांकडून आखण्यात येत आहेत. रस्त्यांवर पदपथ दिवे लावणे, उड्डाणपुलावरील संरक्षक भिंत उभारणे आदी उपाययोजनांसोबतच मुख्य रस्ते ओलांडणे हे पादचाऱ्यांसाठी जिकिरीचे होते. हे लक्षात घेऊन जंक्शनमध्ये बदल केले आहेत.
अपघातांच्या नेमक्या कारणांचा आढावा
पोलिसांनीही ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, भरधाव वाहने चालवणे, विरुद्ध दिशेने वाहतूकविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. वाहतूक पोलिसांनी अपघातांच्या नेमक्या कारणांचा आढावा घेत त्यानुसार केलेल्या उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण घटले आहे. तसेच, ई-चलान, विविध जनजागृती उपक्रमातून बेशिस्त चालकांना शिस्त लावण्यासही मदत होत आहे.
२ हजार २५ जणांचे परवाने निलंबित
- सह पोलिस आयुक्त अनिल कुंभारे यांनी ड्रंक अँड ड्राइव्ह विरुद्ध आक्रमक भूमिका घेत थेट गुन्हे नोंदवण्याचे आदेश केल्याने अपघाताच्या घटना कमी होण्यास ते महत्त्वाचे ठरले.- एप्रिल २०२४ ते जानेवारी दरम्यान ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी ३,७११ गुन्हे नोंदवत २,४३८ जणांचे परवाने रद्द कारण्याबाबतचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवण्यात आला.- त्यापैकी आतापर्यंत २०२५ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. आणखी ६०० जणांचे परवाने रद्द करण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.
Web Summary : Mumbai road accidents claimed 4,198 lives in a decade. Deaths decreased from 2016 due to traffic police measures. Drunk driving and rule violations are major causes. Increased enforcement and public awareness are helping reduce accidents.
Web Summary : मुंबई में सड़क दुर्घटनाओं में एक दशक में 4,198 लोगों की जान गई। यातायात पुलिस के उपायों के कारण 2016 से मौतों में कमी आई है। शराब पीकर गाड़ी चलाना और नियमों का उल्लंघन प्रमुख कारण हैं। बढ़ते प्रवर्तन और जन जागरूकता से दुर्घटनाओं को कम करने में मदद मिल रही है।