Join us

महापालिकेच्या इंग्रजी शाळांमधील १,२४२ जागांसाठी तब्बल २,७२२ अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:46 IST

पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई : महापालिकेच्या १८ सीबीएसई, एक आयबी, एक आयसीएसई आणि एक आयजी मंडळाच्या शाळांसाठी पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या शाळांमधील १,२४२ जागांसाठी २,७२२ म्हणजेच दुपटीहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे या शाळांकडे पालकांचा ओढा असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पालिकेच्या केंद्रीय मंडळांच्या या १२ शाळांत पूर्व प्राथमिकच्या एका वर्गात ४० याप्रमाणे नर्सरीच्या ४८० जागा आहेत. याव्यतिरिक्त इतर वर्गांतील काही रिक्त जागा मिळून ७२२ जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यात शाळेच्या तीन किलोमीटर परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येक शाळेत ४० विद्यार्थ्यांची तुकडी असून, १५ टक्के आरक्षणाप्रमाणे सहा जागा राखीव आहेत. 

१६-१८ फेब्रुवारी रोजी लॉटरीप्रवेशाची सोडत १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महापालिका शिक्षण विभागातील प्रवेश प्रक्रिया समन्वयक अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे तोपर्यंत पालकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

शाळांमध्ये प्रवेशासाठी आलेले अर्ज  शाळा    क्षमता    अर्ज सीबीएसई, प्रतीक्षानगर    ६८    २००सीबीएसई, मिठागर    ६८    ७८ सीबीएसई, हरियाली    ६८    १८७ सीबीएसई, भवानी शंकर मार्ग    ६८    २०७ सीबीएसई, पूनमनगर    ६८    २५७ आयसीएसई, वूलन मिल    ६८    १२३सीबीएसई, चिकूवाडी    ६८    १७८सीबीएसई, जनकल्याण नगर    ६८    ९७सीबीएसई, राजावाडी    ६८    १९७ सीबीएसई, अजीज बाग    ६८    १७२सीबीएसई, तुंगा व्हिलेज    ६८    १७९सीबीएसई, काने नगर    ६८    १००सीबीएसई, वीर सावरकर मार्ग    ३४    ६८ सीबीएसई, मालवणी    ६८    ६२सीबीएसई, नटवर पारेख कंपाउंड    ६८    १३९सीबीएसई, शांती नगर    ६८    ७४ सीबीएसई, क्रॉस रोड    ६८    ७३ सीबीएसई, आशिष तलाव    ६८    ७३ आयबी, विलेपार्ले    २६    ३८आयजी, एल. के. वागजी    २६    ११६

टॅग्स :शाळा