विनाकारण तब्बल २७० विद्यार्थ्यांना नापास केले, तीन शिक्षकांना काढले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:55 IST2025-10-01T12:55:27+5:302025-10-01T12:55:46+5:30
एसआयडब्ल्यूएस महाविद्यालयाबाहेर आंदोलन

विनाकारण तब्बल २७० विद्यार्थ्यांना नापास केले, तीन शिक्षकांना काढले!
मुंबई : २७० विद्यार्थ्यांना विनाकारण नापास केले. तसेच तीन शिक्षकांना नाहक त्रास देऊन त्यांना कामावरून काढले, असा आरोप कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेने एसआयडब्ल्यूएस महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांवर केला आहे. या विरोधात संघटनेने सोमवारी महाविद्यालयातच निषेध आंदोलन केले, तर आंदोलकांचे सर्व आरोप निराधार असल्याचे कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य शीला कृष्णन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
संस्थेतील उपप्राचार्यांकडून दडपशाही केली जात असल्याचा आरोप कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस मुकुंद आंधळकर यांनी केला आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना दिलेल्या २२ सप्टेंबर रोजीच्या कारणे दाखवा नोटीसही मागे घेण्यात याव्यात. शिवाय गैरवर्तवणूक करणाऱ्या उपप्राचार्य प्राध्यापक शीला कृष्णन यांच्यावरच कारवाई करण्यात यावी, अशीदेखील मागणी संघटनेने केली.
दहावी किंवा बारावीचा निकाल अत्यंत चांगला लागलेला आहे. त्यामुळे ज्यांनी आरोप केले आहे, ते पूर्णपणे निराधार आहे.
शीला कृष्णन, उपप्राचार्य, एसआयएसडब्ल्यू कनिष्ठ महाविद्यालय, वडाळा
नापास केलेल्या २१० विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात प्रवेश द्यावा. सेवा समाप्ती केलेल्या शिक्षकांना पुन्हा सेवेत घ्यावे.
मुकुंदराव आंधळकर, सरचिटणीस, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना.