सांस्कृतिक कलावतांचे मानधन सुरु करण्याच्या मागणीसाठी मुंबईत कलाकारांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2023 18:21 IST2023-06-05T18:21:03+5:302023-06-05T18:21:13+5:30
कोरोनाच्या काळापासून यांचे सर्व कार्यक्रम बंद झाले. त्यामुळे उपजीविकेचे दुसरे कुठले साधन यांच्याकडे नाही.

सांस्कृतिक कलावतांचे मानधन सुरु करण्याच्या मागणीसाठी मुंबईत कलाकारांचे आंदोलन
मुंबई: सांस्कृतिक कलाकारांचा कार्यक्रम करण्याचा व्यवसाय आहे. ते पारंपारिक संस्कृतीचे जतन करण्याचे कार्य करीत असतात. संस्कृतीची जाणीव होण्यासंबंधीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत असतात. हे सतत कार्यरत असतात सांस्कृतिक कलावंतांचे मानधन सुरु करण्यासाठी हे कलाकार आंदोलन करायला बसलेले आहेत.
कोरोनाच्या काळापासून यांचे सर्व कार्यक्रम बंद झाले. त्यामुळे उपजीविकेचे दुसरे कुठले साधन यांच्याकडे नाही. त्यामुळे हे बेरोजगार झाले आहेत. भवानी मातेचे जागरण, गोंधळ, भारुड, भजने कीर्तन तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याचा व लोकांच्या मनात चांगल्या भावना निर्माण करून परमेश्वराबद्दल आपुलकी व भक्ती भावना जागरूक करण्याचा प्रयत्न करीत असतात.
वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून महाराष्ट्रातील जनसामान्यात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे अशा या गरीब कलाकारांचा विचार करून योग्य ते मानधन चालू करावे व अतुल एक्सप्रेस ट्रेनला जय भवानी ट्रेन असे नाव देण्यात यावे अशा दोन मागण्यांसाठी हे कलाकार आंदोलन करण्यासाठी बसलेले आहेत.