काँग्रेस नेत्याच्या मुलीस धमकावणाऱ्या इसमाला अहमदाबादमधून केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 23:45 IST2018-07-05T23:45:16+5:302018-07-05T23:45:26+5:30

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणा-या एका तरुणास मुंबई पोलिसांनी अहमदाबादमधून अटक केली आहे.

 The arrest of a Congress leader's daughter has been made from Ahmedabad | काँग्रेस नेत्याच्या मुलीस धमकावणाऱ्या इसमाला अहमदाबादमधून केली अटक

काँग्रेस नेत्याच्या मुलीस धमकावणाऱ्या इसमाला अहमदाबादमधून केली अटक

अहमदाबाद/मुंबई : काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणा-या एका तरुणास मुंबई पोलिसांनी अहमदाबादमधून अटक केली आहे. गिरीश माहेश्वरी असे त्याचे नाव असून, त्याने स्वत:च्या ट्विटर हँडलवरून प्रियंका चतुर्वेदी यांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. 
काही दिवसांपूर्वी ही धमकी आल्याने प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात तसेच दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. गृह मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि संबंधिताविरोधात लगेच गुन्हा नोंदवून त्याचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
गोरेगाव पोलिसांनी आधी अज्ञात इसमाविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आणि गिरीश माहेश्वरी याचा शोध सुरू केला. तो गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळताच, गोरेगाव पोलिसांनी तेथे धाव घेतली आणि त्याला शोधून काढून लगेचच अटकही केली. त्याला मुंबईत न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आयटी कायद्याखालीही त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांचे मानले आभार
पोलिसांनी या घटनेची दखल घेऊ न आरोपीस लगेच अटक केल्याबद्दल प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांचे तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाचे आभार मानले आहेत.

Web Title:  The arrest of a Congress leader's daughter has been made from Ahmedabad

टॅग्स :Arrestअटक