अरमान कोहलीवरील गुन्हा उच्च न्यायालयाने केला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:50 AM2018-06-16T06:50:11+5:302018-06-16T06:50:11+5:30

प्रेयसीला मारहाण केल्याचा आरोप असलेला अभिनेता अरमान कोहली याला उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलासा दिला. आपल्यावरील गुन्हा रद्द व्हावा, यासाठी कोहलीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

 Armaan Kohli's offense has been canceled by the High Court | अरमान कोहलीवरील गुन्हा उच्च न्यायालयाने केला रद्द

अरमान कोहलीवरील गुन्हा उच्च न्यायालयाने केला रद्द

Next

मुंबई : प्रेयसीला मारहाण केल्याचा आरोप असलेला अभिनेता अरमान कोहली याला उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलासा दिला. आपल्यावरील गुन्हा रद्द व्हावा, यासाठी कोहलीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. केलेल्या कृत्याचा आपल्याला पश्चात्ताप होत आहे, असेही कोहलीने न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने अरमान कोहलीवरील गुन्हा रद्द करत त्याची तुरुंगातून सुटका करण्याचा आदेश तुरुंग प्रशासनाला दिला आहे.
पीडिता नीरू रंधवा हिने ही केस पुढे चालविण्याची इच्छा नसल्याचे सांगितल्याने गुन्हा रद्द करणे योग्य ठरेल, असे न्या. आर.एम. सावंत व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने म्हटले. अरमान कोहलीने पुन्हा असे आपण वागणार नाही, असे आश्वासनही न्यायालयाला दिले.
शुक्रवारच्या सुनावणीत स्वत: नीरू रंधवा न्यायालयात उपस्थित होती. तिने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात तिने कोहलीत आणि तिच्यातील वाद सामंजस्याने सुटल्याचे न्यायालयाला सांगितले. ‘कोहलीचे कुटुंबीय आणि आमच्या मित्रांच्या मध्यस्थीने हा वाद सुटला आहे. कोहलीच्या कुटुंबाने नुकसानभरपाई दिली असून आणखी काही ‘पोस्ट डेटेड’ चेक्स मिळणार आहेत,’ असे तिने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
नीरू रंधवाला मारहाण केल्याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी अरमान कोहलीला १२ जून रोजी लोणावळ्याहून अटक केली. त्यानंतर त्याला वांद्रे दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. दंडाधिकाºयांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याचबरोबर त्याचा जामीन अर्जही फेटाळला.
नीरू रंधवाच्या तक्रारीनंतर सांताक्रुझ पोलिसांनी कोहलीवर आयपीसी ३२३, ३२६,५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदविला.

दोन लाखांचा दंड

न्यायालयाने कोहलीने दिलेले आश्वासन मान्य करून त्याच्यावरील गुन्हा रद्द केला असला तरी त्याला सामाजिक कामासाठी दोन लाख रुपये दंड ठोठावला आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या लहान मुलांच्या शाखेसाठी एक लाख रुपये देणगी व नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडलाही एक लाख रुपये देणगी म्हणून देण्याचा आदेश दिला आहे.

Web Title:  Armaan Kohli's offense has been canceled by the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.