Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: हॉटेलमध्ये चीजच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक? FDA कडून कडक नियमावली जारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:36 IST

राज्यातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स,केटरर्स व फास्ट फूड विक्रेत्यांकडून 'चीज ॲनालॉग'चा वाढता वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ग्राहकांची दिशाभूल होऊ नये आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित व्हावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: राज्यातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स,केटरर्स व फास्ट फूड विक्रेत्यांकडून 'चीज ॲनालॉग'चा वाढता वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ग्राहकांची दिशाभूल होऊ नये आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित व्हावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.

चीज ॲनालॉग' हा पदार्थ दूधाव्यतिरिक्त स्टार्च, इमल्सिफायर इत्यादी वापरून तयार केला जातो आणि तो दिसायला चीजसारखा असला तरी 'पनीर' किंवा 'चीज' मानला जात नाही. मात्र, काही ठिकाणी 'पनीर अनालॉग किंवा 'चीज ॲनालॉग' हे पदार्थ 'पनीर" किंवा 'चीज' या नावाने विकले जात असून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा पदार्थांचा वापर करताना बिल, मेन्यू कार्ड किंवा डिस्प्ले बोर्डवर स्पष्टपणे 'चीज ॲनालॉग असा उल्लेख करावा, अशा स्पष्ट सूचना सर्वं अन्न व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत.

ग्राहकांनी पॅकबंद पनीर खरेदी करताना लेबलचा 'ॲनालॉग' असा उल्लेख आहे का ते तपासावे. पनीर घेताना ते शुद्ध दुधापासून बनवले आहे का, याची खात्री करावी, संशय असल्यास बिल मागावे. हॉटेलमध्ये ऑर्डर देताना पनीर व चीज ॲनालॉग हे वेगवेगळे पदार्थ आहेत का, याची खात्री करण्याच्या सूचना केल्या. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, केटरर्स यांनी चीज ॲनालॉग वापरून पदार्थ तयार केल्यास त्याची माहिती ग्राहकांना देण्याच्याही सूचना केल्या.

ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन कटिबद्ध आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. अन्न परवाना घेताना दिलेले मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत ठेवावेत. चुकीची माहिती दिल्यास किंवा अद्ययावत न ठेवल्यास कारवाई केली जाईल.श्रीधर डुबे पाटील, अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र

बिलावरही स्पष्ट उल्लेख करण्याच्या सूचना

खरेदी बिलावरही संबंधित पदार्थांचा स्पष्ट उल्लेख कनावा, अशा सूचना दिल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त महेश चौधरी यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: FDA Warns Hotels Against Cheese Analog Fraud, Issues Guidelines

Web Summary : Maharashtra FDA mandates clear labeling of 'cheese analog' in restaurants to prevent customer deception. 'Cheese analog,' made with starch instead of milk, must be distinctly identified on menus and bills. Violators face action under food safety laws. Customers are urged to check labels.
टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र