Join us

मुंबई- सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड मार्गाच्या भूसंपादनाला मंजुरी; मार्गाच्या आखणीला सरकारची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 07:51 IST

३८८ किलोमीटर मार्गाच्या आखणीला सरकारची मान्यता

मुंबई : समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते सिंधुदुर्गदरम्यान सहापदरी ग्रीन फिल्ड कोकण द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे. या महामार्गासाठी चार टप्प्यांतील एकूण ३८८.४५ किलोमीटर मार्गाच्या अंतिम आखणीला व भूसंपादनाला राज्य सरकारने गुरुवारी मान्यता दिली. 

मुंबई ते सिंधुदुर्ग असा ग्रीन फिल्ड कोकण द्रुतगती उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता.  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीची या महामार्गासाठी अंमलबजावणी संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार एमएसआरडीसीने या महामार्गासाठी विविध पर्यायी आखणींचा अभ्यास करून चार टप्प्यांतील अंतिम आखणी प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला. 

या मार्गाची आखणी कोकणपट्टीच्या किनाऱ्याजवळून करण्यात येणार असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोकणचे निसर्गसौंदर्य पाहता येईल, असा दावा या ग्रीन फिल्ड महामार्गाची घोषणा करताना करण्यात आली होती.

टॅग्स :रस्ते वाहतूकसिंधुदुर्गमुंबई