जगाने दखल घेतलेल्या 'धारावी पॅटर्न'चे कॅप्टन इक्बाल सिंह चहल यांना बढती, केंद्रात सचिवपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 19:04 IST2022-05-28T18:51:30+5:302022-05-28T19:04:55+5:30
ठाकरेंचे विश्वासू असलेले अधिकारी इक्बाल सिंह चहल यांना केंद्रात बढती दिली आहे.

जगाने दखल घेतलेल्या 'धारावी पॅटर्न'चे कॅप्टन इक्बाल सिंह चहल यांना बढती, केंद्रात सचिवपदी नियुक्ती
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कॅबिनेट अपॉइंटमेंट कमिटीनं ९ ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची भारत सरकारच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे. त्यात मध्य प्रदेशातील १९८९ बॅचचे आशिष उपाध्याय, महाराष्ट्रातील राजीव जलोटा, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, बिहारचे अमृतलाल मीना, ओडिसाहून नितीन चंद्र, श्रीनिवास गुडे आणि संजीव चोपडा, पश्चिम बंगालहून सुब्रतो गुप्ता, पंजाब रवनीत कौर यांचा समावेश आहे.
ठाकरेंचे विश्वासू असलेले अधिकारी इक्बाल सिंह चहल यांना केंद्रात बढती दिली आहे. कोरोना काळात इक्बाल सिंह चहल यांनी केलेल्या कामाचं प्रत्येकाने कौतुक केले. मुंबईत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी इक्बाल चहल यांनी अनेक निर्णायक पाऊल उचलली. मुंबई महापालिकेच्या धारावी पॅटर्नचं कौतुक जगभरात झाले. मागील वर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते इक्बाल सिंह चहल यांचा लोकमत महाराष्ट्रियन ऑफ द इयर पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता. (Iqbal Singh Chahal Transfer)
महाराष्ट्रात जल संधारण आणि शहरी विकास मंत्रालयात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्यानंतर मुंबई महापालिका आयुक्तपदावर त्यांची वर्णी लावण्यात आली. वयाच्या २२ व्या वर्षी इक्बाल सिंह चहल यांनी १९८९ मध्ये आयएसएस परीक्षा उत्तीर्ण केली होती. इतक्या कठीण परीक्षेत यश मिळवणारे कमी वयाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव झाले.