महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ यांची पिंपरी -चिंचवडला नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:45 IST2019-09-17T05:45:25+5:302019-09-17T05:45:32+5:30

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या विशेष महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Appointment of Inspector General of Prakash Mutal to Pimpri-Chinchwad | महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ यांची पिंपरी -चिंचवडला नियुक्ती

महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ यांची पिंपरी -चिंचवडला नियुक्ती

मुंबई : नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या विशेष महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवृत्तीपर्यंत म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत या आयुक्तालयात या दर्जाच्या पदाची निर्मिती केली आहे. गृह विभागाने त्याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले. निवृत्तीला सहा महिन्यांचा अवधी असलेल्या अधिकाऱ्यांची निवडणुकीशी संबंध येणाºया थेट पदावरून अन्यत्र बदली करण्यात यावी, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत. त्यानुसार अमरावतीच्या महानिरीक्षकपदी असलेल्या मुत्याळ यांना तेथून हटवून त्यांच्या जागी महाराष्टÑ परिवहन महामंडळाचे मुख्य दक्षता अधिकारी मनोज लोहिया यांची नियुक्ती झाली. त्यांचे पदही रिक्त ठेवले होते. अखेर ते पदच तात्पुरत्या स्वरूपात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात निर्माण करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला. त्या पदावर प्रकाश मुत्याळ यांची निवड करण्यात आली.

Web Title: Appointment of Inspector General of Prakash Mutal to Pimpri-Chinchwad