Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह ११ जणांच्या नियुक्ती रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 18:55 IST

गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता.

मुंबई -  महिला  आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ व 10 सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्यात आल्या आहेत. महिला व बाल विकास विभागाच्यावतीने त्याबाबतचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले. 

गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता.तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची महामंडळाच्या उपाध्यक्षपदावर निवड केली होती. मात्र निवडणुकीनंतर राज्यात भाजपाबरोबरची युती तोडून  शिवसेनेने दोन्ही काँग्रेससमवेत सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीकडून भाजपाने  विविध महामंडळावर केलेल्या नियुक्ती रद्द करण्यात येत आहेत. त्याचअनुषंगाने महामंडळातील नियम 85, (1) व नियम 66 (1) च्या तरतूदीला अधीन राहुन  उपाध्यक्ष चित्रा वाघ व अन्य 10 सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. 

अन्य सदस्यांची नावे अशी :दर्शना महाडिक (रत्नागिरी ), विना तेलंग (नागपूर ),  शलाका साळवी, रितू तावडे (दोघी मुंबई ), चंद्रकांता सोनकाबळे (पिपंरी ), मीनाक्षी पाटील (लातूर ), साधना सुरडकर (औरंगाबाद ), उमा रामशेट्टी (परळी ),  शैलजा  गर्जे (आष्टी ) व अर्चना डेहनकर (नागपूर ) 

टॅग्स :चित्रा वाघभाजपा