कोकणातील घरांसाठी आजपासून अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 09:46 IST2024-10-11T09:45:42+5:302024-10-11T09:46:11+5:30
सदनिकांची संख्या १२,६२६ ; ११७ भूखंडही विक्रीस

कोकणातील घरांसाठी आजपासून अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे १२ हजार ६२६ सदनिकांच्या विक्रीसाठी आज, शुक्रवारी दुपारी १२ वाजता म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
या सोडतीत ठाणे शहर व जिल्हा, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील ओरोस, वेंगुर्ला आणि मालवण येथील घरांचा समावेश आहे. सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ९८८३ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर योजनेअंतर्गत ५१२ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ६६१ सदनिका आहेत. तसेच मंडळाच्या विखुरलेल्या १३१ सदनिकांचाही समावेश आहे.