सिनेट निवडणुकांसाठी अर्ज स्विकारले मग छाननी का नाही?

By सीमा महांगडे | Updated: August 21, 2023 20:01 IST2023-08-21T20:01:15+5:302023-08-21T20:01:30+5:30

विद्यापीठात कुलगुरू दालनासमोर युवासेनेचे ठिय्या आंदोलन, ९ ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. पण, अवघ्या दहा दिवसाच्या आतच सिनेट निवडणूका स्थगितीचा निर्णय घेण्यातआला.

Applications accepted for Senate elections, why no scrutiny? | सिनेट निवडणुकांसाठी अर्ज स्विकारले मग छाननी का नाही?

सिनेट निवडणुकांसाठी अर्ज स्विकारले मग छाननी का नाही?

मुंबई- मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक स्थगित केल्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये आधीच संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच नियोजित वेळापत्रकानुसार सोमवारी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज छाननी चा दिवस असल्यामुळे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सर्व १० उमेदवार मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात दाखल झाले. उमेदवारी अर्जांची छाननी करण्यासाठी त्यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी उपकुलसचिव विकास डवरे यांच्या कार्यालयाला घेराव घेतला. शिवाय जोपर्यंत कुलगुरू भेट देत नाहीत तोपर्यंत त्यांचं दालनासमोर ठिय्या आंदोलनाचा निर्णय युवासेना सदस्यांकडून घेण्यात आला आहे.

९ ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. पण, अवघ्या दहा दिवसाच्या आतच सिनेट निवडणूका स्थगितीचा निर्णय घेण्यातआला. १७ ऑगस्ट २०२३ ला पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निवडणूक प्रक्रियेच्या स्थगितीचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र ‘स्थगितीनंतरही शेवटच्या दिवशी अनामत रक्कम घेऊन उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज स्विकारण्यात आले होते. मग नियोजित वेळापत्रकाप्रमाणे अर्जांची छाननी का केली जात नसल्याचा प्रश्न युवा सेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे. सोमवारी, छाननीसाठी युवा सेनेचे १० पैकी १० उमेदवार फोर्ट संकुलात उपस्थित होते परंतु एकही वरीष्ठ अधिकारी उपस्थित नसल्यामुळे विद्यापीठाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी उपकुलसचिव विकास डवरे यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांनी छाननी करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्या कार्यालयास कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याची माहिती  ठाकरे गटाच्या युवा सेनेचे माजी अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली. 

निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अखेर
उमेदवारांच्या नामनिर्देशन अर्जांची छाननी करायची की नाही याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील. हा निर्णय माझ्या अखत्यारित नाही’, असे विकास डवरे यांनी स्पष्ट केले. 

१७ ला स्थगिती मग १८ ला अर्ज स्विकारले कसे?
नियोजित वेळात्रकानुसार शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या दहापैकी दहा उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात नामनिर्देशन अर्ज प्रत्यक्ष पद्धतीने अनामत रक्कम देऊन जमा केले होते. त्यामुळे नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीला स्थगिती असताना मुंबई विद्यापीठ प्रशासनाने उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज स्वीकारले कसे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  

Web Title: Applications accepted for Senate elections, why no scrutiny?