मुंबई : अॅपआधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना परिवहन विभागाने ठरवून दिलेले भाडे अॅपवर दाखवत नसल्याने त्यांच्याविरोधात चालकांनी मंगळवारी आझाद मैदानातआंदोलन केले. दरम्यान, आमच्या हक्काचे पैसे बुडवणाऱ्या कंपनीवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. इलेक्ट्रिक बाइक टॅक्सीला परवानगी दिली असताना केवळ पेट्रोलची बाइक टॅक्सी सुरू असल्याने ती तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
आरटीओने दिले होते. असे असताना कंपनीकडून केवळ ११ रुपयांप्रमाणे भाडे आकारण्यात येत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, धनाढ्य कंपन्यांकडून एक रुपयाचासुद्धा दंड वसूल करण्याची परिवहन विभागाची हिंमत नाही, अशी टीका भारतीय कामगार गीग मंचचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी केली आहे.
बदनामी कराल, तर कारवाई करूपरिवहन विभागाची बदनामी होणार नाही, याची दक्षता चालकांनी घ्यावी व शहरातील बदनामीकारक फलक काढून टाकावेत, तसेच अशी बदनामी होत राहिल्यास आपल्या संघटनेविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणचे सचिव भारत कळसकर यांनी दिला आहे.
Web Summary : App-based taxi drivers protested in Mumbai against companies not implementing government-set fares. They demanded action against companies withholding payments and the shutdown of unauthorized petrol bike taxis. Officials warned against defaming the transport department.
Web Summary : ऐप-आधारित टैक्सी चालकों ने सरकारी किराए लागू न करने वाली कंपनियों के खिलाफ मुंबई में विरोध प्रदर्शन किया। उन्होंने भुगतान रोकने वाली कंपनियों और अनधिकृत पेट्रोल बाइक टैक्सियों को बंद करने की मांग की। अधिकारियों ने परिवहन विभाग को बदनाम करने के खिलाफ चेतावनी दी।