मुंबई: काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी मुंबईत खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात बॅनरबाजी केल्याचे निदर्शनास आले. या बॅनर्सवर 'आपण यांना पाहिलंत का?' या मथळ्याखाली अरविंद सावंत यांचे छायाचित्र छापण्यात आले होते. गेल्या चार वर्षांपासून आमचा खासदार हरवला आहे. जिथे असतील तिथून लवकर निघून या. आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही, असा उपरोधिक मजकूरही या बॅनरवर छापण्यात आला होता. दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली मार्गावर हे बॅनर्स लावण्यात आले होते. ही गोष्ट शिवसैनिकांना समजतात त्यांनी संपूर्ण परिसरात फिरून हे सर्व बॅनर्स उतरवले आहेत. यामुळे आता आगामी काळात मुंबईत शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात राजकीय युद्ध रंगण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सुधांशु भट यांच्याकडून हे बॅनर्स लावण्यात आले होते. याविषयी त्यांनी विचारले असता आम्हाला लोकशाही पद्धतीने विरोध करायचा हक्क असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार गेले कुणीकडे? ; मुंबईत काँग्रेसकडून अरविंद सावंतांविरोधात बॅनरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 09:14 IST