अण्णाभाऊ साठे स्मारक कागदावर, उपाध्यक्षांचे मात्र राज्यभर दौरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 05:13 AM2018-10-24T05:13:00+5:302018-10-24T05:13:06+5:30

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्मारक समितीमध्ये नियम धाब्यावर बसवून कर्मचारी भरती करण्यात आली.

Annabhau Sathe memorial paper, only state-wide visits to the Vice President | अण्णाभाऊ साठे स्मारक कागदावर, उपाध्यक्षांचे मात्र राज्यभर दौरे

अण्णाभाऊ साठे स्मारक कागदावर, उपाध्यक्षांचे मात्र राज्यभर दौरे

googlenewsNext

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्मारक समितीमध्ये नियम धाब्यावर बसवून कर्मचारी भरती करण्यात आली. स्मारकासाठी कुठलीही हालचाल नाही, पण समितीचे उपाध्यक्ष व सदस्य सचिव मधुकर कांबळे राज्यभर दौरे करत फिरत आहेत.
समितीची स्थापना करणारा शासकीय आदेश एक वर्ष एक महिना आधी काढण्यात आला होता. चिरागनगर-घाटकोपर येथे अण्णा भाऊ साठे ज्या घरात राहत असत त्या जागेवर स्मारक उभारण्याचे प्रस्तावित आहे. पालिका व खासगी मिळून सहा एकर जमिनीवर एसआरए, व्यावसायिक वापर व स्मारक उभारणार असे स्वप्नदेखील रंगविण्यात आले.
या कार्यालयात उपाध्यक्षांच्या जवळचे कर्मचारी नेमण्यात आले आहेत. भाजपाचे एक विधानसभा सदस्य आणि विधान परिषदेतील एका अपक्ष आमदाराचे कांबळे यांना वेगवेगळ्या बाबींमध्ये विशेष सहकार्य होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना थेट उपाध्यक्षांच्या सहीचे आणि राजमुद्रा अंकित असलेले ओळखपत्र देण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, या प्रकाराबाबत राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या पण दखल घेण्यात आली नाही. अशा समितीच्या गोवंडी येथील नव्या जागेतील कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी कांबळे उद्या जात आहेत. ते या समितीचे अध्यक्ष आहेत. स्मारक समिती कार्यालयातील कर्मचाºयांना एक छदामही पगार मिळत नाही. सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाºया पुणे येथील बार्टी या संस्थेमार्फत आणि आऊटसोर्सिंगने कर्मचारी भरती करावी, असे शासकीय आदेशात म्हटले होते. त्याची पायमल्ली करून मनमानी भरती करण्यात आली आहे.

Web Title: Annabhau Sathe memorial paper, only state-wide visits to the Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.